शिधावाटप दुकानधारकाकडून मोफत अन्नधान्याचा अपहार


नवी मुंबई - एकीकडे कोरोनाचा फटका तर दुसरीकडे रेशनिंग दुकानधारकाचा,अश्या गर्तेत अडकलेल्या सामान्य नागरिकांना जगायचे तरी कसे असा प्रश्न पडला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कामाला जाता येईना तर घरात खायला मिळेना अश्या दुहेरी संकटात नेरुळ महात्मा गांधी नगर मधील रहिवाशी अडकले आहेत.यातून मार्ग निघावा म्हणून या नगरातील नागरिकांनी थेट होणाऱ्या अन्यायाचा पाढा घेऊन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
                    कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने सामान्य नागरिकांसाठी रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून मोफत व स्वस्त अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा काही रेशनिंग दुकानधारकांकडून उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी अन्नधान्य नियमानुसार न देता कमी तर काही ठिकाणी देण्यातच येत नसल्याच्या घटना समोर येत आहेत.त्यातच नेरुळ मधील शिवाजी नगर एम आय डी सी मध्ये असलेल्या रेशनिंग दुकानधारकाडून तेथील काही नागरिकांना तब्बल दोन महिने अन्नधान्यच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाकडून आलेले हे अन्नधान्य सदरील दुकानधारकाने काळ्या भावाने विकल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.कोणाच्या आशीर्वादाने सदरील दुकानधारक शासनाची दिशाभूल करत आहे अशीही चर्चा या विभागात सुरु आहे.गेल्या दोन महिन्यांत संयमाचा कळसच या दुकानधारकाने गाठल्याने अखेर या विभागातील शेकडो नागरिकांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेत लेखी निवेदनामार्फत सर्व प्रकार सांगितला.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जर आम्ही शासनाचे नियम पाळत असू तर शासनाकडून येणारे आमच्या हक्काचे अन्नधान्य आम्हाला मिळायलाच हवे.अशी मागणी यावेळी नागरिकांनी सुतार यांच्याकडे केली.ज्यांना धान्य दिले त्यांनी पोच पावती मागितली असता त्यांना तीही देण्यात येत नाही.एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत शासनामार्फत शिधावाटप कार्ड वरील प्रत्येक सदस्यास ५ किलो तांदूळ व एक किलो डाळ देण्यात आली नाही.अखेर हा अन्नधान्य साठा गेला तरी कुठे याचीही चौकशी व्हायला हवी अशी अपेक्षाही यावेळी नागरिकांनी केली.

कोट - नेरुळ महात्मा गांधी नगर मधील नागरिकांच्या समस्यांचे लेखी निवेदन प्राप्त झाले असून ते मी शिधावाटप अधिकारी ,अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच संबंधित विभागाकडे सूपूर्द करण्यात आले आहे.
जयवंत सुतार - महापौर ,नवी मुंबई

कोट - नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार त्याचबरोबर अजूनही काही जणांच्या तक्रारी आल्या असून त्यावर चौकशी सुरु आहे.याचा अहवाल प्राप्त होताच योग्य ते पाऊल उचलण्यात येईल.

मुळीक  - शिधावाटप अधिकारी ,वाशी 


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू