नवी मुंबई महापालिकेतील कायम कर्मचाऱ्याची आत्महत्या 

नवी मुंबई - महानगरपालिकेतील कायम कर्मचारी संतोष नाईक यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली.या प्रकरणाची नेरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून नाईक पालिकेत काम करत होते.
               मयत संतोष नाईक नेरुळ दारावे गावात राहणारे होते.गेल्या १५ वर्षांपासून ते नवी मुंबई महानगरपालिकेतील अकाउंट विभागात कार्यरत होते. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी गावातील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.सदर बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आल्यांनतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले गणपती विसर्जनानंतर नाईक कामावर हजरच झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून कळू शकले नसून त्याचा तपास करण्यात येत असल्याचे नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून ते व्यवसानाच्या आहारीही गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.गावातील प्रसिद्ध व्यक्ती विनायक नाईक यांचे ते सुपुत्र असल्याने दारावे गावात खळबळ माजली आहे.


Popular posts
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image