सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन


मुंबई - सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  


         मुंडे म्हणाले, सफाई कामगारांबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत  प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू