अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

नवी मुंबई :- नेरुळ, शिरवणे गावातील अनधिकृत लॉजिंग चा मुद्दा चव्हाट्यावर असतांनाच त्याच विभागातील शुभोदया लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कारवाई झाल्याचा प्रकार समोर आल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.सोमवारी रात्री गुन्हे शाखा पोलिसांनी शुभोदया लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर टाकलेल्या छाप्यात सात मुलींची सुटका करण्यात आली आहे.यावरून शिरवणे गावातील लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची बाब समोर आली आहे.यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी अजून त्यात भर घालण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याने प्रशासन नागरिकांचे रक्षक आहे की भक्षक असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

             शिरवणे गावातील शुभोदया लॉजवर मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष तीन ला मिळाली होती. यावरून वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे, सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक आकाश पाटील, यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी लॉज मालक व दलाल यांच्यामार्फत तिथे चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला.या प्रकरणी रिंतुकुमार गौडा, संजितकुमार यादव, दलाल सचिन मंडल, अब्दुल्ला तरपदार व इतर काहींवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवणे गाव परिसरात डान्सबार, लॉज यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहेत. त्याविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना दाद मिळत नसल्याने अवैध धंदेवाल्याचे फावताना दिसत आहे. परंतु वरिष्ठांकडूनच अवैध धंद्यात "मिली भगत" होत असल्याने सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शिरवणे गावाची डान्स बार, बार रेस्टोरंट, अवैध व्यवसाय, अनधिकृत बांधकामात आघाडीवर अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे . शिरवणे गावात आता लॉजिंग आणि बोर्डिंग धारकांनी धुमाकूळ माजवला आहे.लॉजिंग बोर्डिंग ची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असून आता निवासी जागेवरच लॉजिंग बांधण्याचे प्रकार सुरु आहेत.याच गावातील भूखंड क्रमांक ३०६ वर सध्या लॉजिंग चे काम सुरु असून या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.जुन्या बांधकामावर नव्याने लॉजिंगचे काम सुरु असल्याची माहिती मिळताच शिरवणे ग्रामस्थांनी बैठक घेत या बांधकामाला विरोध करत सह्यांची मोहीम राबवली.या सर्वांच्या सह्यांचे पत्र नेरुळ विभाग अधिकारी यांना दिले.सदरील बांधकामाला कोणतीही परवानगी नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता या बांधकामावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.तक्रार देऊन विभाग कार्यालयाकडून कारवाईला दिरंगाई होत असलयाने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.शिरवणे गावाच्या आजूबाजूला कोणतेही पर्यटन स्थळ अथवा धार्मिक स्थळ नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात लॉजिंग का असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.गेल्या अनेक वर्षात शिरवणे गावाला बार आणि लॉजिंगचा विळखा पडला आहे.या ठिकाणी शहराबाहेरील नागरिक डान्स बार मध्ये मौज मस्ती करण्यासाठी येत असून लॉजिंगचाही वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येतो.बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून याचा स्थानिक महिलांनाही त्रास होत असल्याने बाहेर जातांना जीव मुठीत धरून त्यांना फिरावे लागते.अनेक वेळा छेडखाणीचे प्रकार या ठिकाणी घडल्याने हाणामारीचे प्रकारही घडले आहे.नवी मुंबईतील शहर हे येथील ग्रामस्थांच्या जमिनीवर वसले असून ग्रामस्थांनी आजही आपली संस्कृती जपली आहे.हीच संस्कृती बिघडवण्याचे काम डान्स बार, बार रेस्टोरंट, अवैध व्यवसाय,अनधिकृत बांधकामधारक करत असल्याने भविष्यात ग्रामस्थांची संस्कृती संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Popular posts
*आला उन्हाळा तब्येत सांभाळा, काय करावे, काय करू नये*
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image