मुलीचा मृतदेह दाखवून मुलाचा मृतदेह दिला ,वाशीतील मनपा रुग्णालयातील प्रकार 


नवी मुंबई  - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा गोंधळ उडाला असून सोमवारी तर चक्क वाशीतील पालिका रुग्णालयातून दिघा येथील कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या मृतदेहाऐवजी तरुणाचा मृतदेह देण्यात आला.तर त्यानंतर अंत्यसंस्कारही पार पाडले.यावर एकच खळबळ उडाली असून यामध्ये नेमका हलगर्जीपणा कोणाचा याचा तपास सुरू असल्याचे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर पोलीस चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करणर असल्याचा इशाराही पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे.
               उलवे येथील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह वाशी रुग्णालयातून गहाळ झाला होता. दिवसभराच्या तपासाअंती मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर आले. मयत तरुण हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे.त्याचा आजारामुळे मृत्यू झाला असून कोरोना चाचणीसाठी ९ मेला त्याचा मृतदेह वाशीतील पालिका रुग्णालयात आणण्यात आला होता.ज्यावेळी तरुणाचा मृतदेह आणण्यात आला त्याचवेळी दिघा येथील एका १८ वर्षीय मुलीचा कावीळने मृत्यू झाल्याने तिचाही मृतदेह त्याचठिकाणी आणण्यात आला होता.दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर १४ मे रोजी दोन्ही मयत तरुण व तरुणीच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवले होते. परंतु तरुणाच्या घरचे पश्चिम बंगालवरून त्या दिवशी वाशीला पोहचू शकले नाहीत. तर मुलीचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले होते.त्यावेळी शवागारातील कर्मचाऱ्याने त्यांना मुलीच्या ऐवजी तरुणाचा मृतदेह दाखवून घाईमध्ये तो बंदिस्त करून अंत्यविधीसाठी ताब्यात दिला. मुलीच्या कुटुंबीयांनी तो स्वीकारून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो बाहेर न काढता त्याच दिवशी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.अखेर चार दिवसांनी त्यांना स्वत:च्या मुलीऐवजी अनोळखी तरुणाचा अंत्यविधी केल्याचे उघड झाले. उलवे येथील उमर शेख (२९) याचा मृतदेह असल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले. उमर याचा मृतदेह व दिघा येथील मुलीचा मृतदेह आजू बाजूला ठेवल्याने हा घोळ झाला. तर उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्याचा भाऊ पालिका रुग्णालयात आला असता, मृतदेह बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचा उलगडा करण्यासाठी पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांच्याकडून सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासात हि बाब समोर आल्याचे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. यामध्ये नेमका हलगर्जीपणा कोणाचा याचा तपास सुरू आहे. 


Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image