कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?

नवी मुंबई (योगेश महाजन) :- एकीकडे अनधिकृत बांधकामांमुळे सामान्य नागरिकांचे संसार उध्वस्त होत असतांना त्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी लाखो रुपये घेऊन स्वतःच्या नेतृत्वाखाली सिडको व मनपाचे अतिक्रमण अधिकारी अनधिकृत बांधकामे पूर्ण करून घेत असल्याचे दिसून येत आहे.बेलापूर मधील ज्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे करण्यात आल्या होत्या,त्याच इमारतींची कामे जोमाने सुरु आहेत.यासाठी खालपासून वर पर्यंत सर्वच यंत्रणा लाखो रुपये घेऊन मॅनेज झाल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

           बेलापूर गाव व शहाबाज गावात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी सिडको अतिक्रमण विभागात एप्रिल २०२५ मध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने सदरील अनधिकृत इमारतींवर सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाया होतील अशी अपेक्षा तक्रार दार यांना होती.मात्र तसे न होता अनधिकृत बांधकाम धारकांना कामे लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.गेल्या चार ते पाच महिन्यात बेलापूर व शहाबाज गावातील अनधिकृत बांधकाम धारकांनी ८० टक्के कामे पूर्ण केल्याने लवकरच त्यात सामान्य नागरिकांना राहायला देण्यात येईल अशी चर्चा आहे.सिडकोतीलच काही कर्मचारी / अधिकारी हे भूमाफियांना सहकार्य करत असलयाचे दिसून येत असल्याने सिडकोच्या अतिदक्षता विभागाकडून त्याची शहनिशा होणे गरजचे असल्याचे सांगण्यात येत आहे.बेलापूर गावातील फ़णसपाडा गावदेवी मंदिराच्या बाजूलाच जी + २ अश्या दोन अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे.न.मु.म.पा शहाबाज अंगणवाडी च्या माघे दोन अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु असून जुना वार्ड ऑफिस शौचालयाच्या माघील बाजुसही अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे.या सर्वाना सिडकोकडूनच अभय मिळत असल्याने अजून काही भूमाफियांनी सिडको अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने बेलापूर व शहाबाज गावात अनधिकृत बांधकामांसाठी भूखंड मिळतायत का याची चाचपणी सुरु केली असल्याची चर्चा बांधकाम व्यावसायिकांमध्ये सुरु आहे.


Popular posts
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image