ॲमेझॉनच्या सी.एस.आर.निधीतून आरोग्य सेवेत सुसज्ज रूग्णवाहिका दाखल

नवी मुंबई - कोव्हीड 19 विरोधीतील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेस विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांचे सुरूवातीपासूनच विविध प्रकारचे सहकार्य लाभले असून यामध्ये काही संस्थानी भरीव स्वरूपातील मदतीचा हात दिलेला आहे.अशाच प्रकारे कन्सर्न इंडिया फाऊंडेशनच्या समन्वयातून ॲमेझ़ॉन वेब सर्व्हिस या नामांकीत समुहाच्या सी.एस.आर. निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्बुलन्स देण्यात आलेली आहे. या रूग्णवाहिकेची प्रतिकात्मक चावी कन्सर्न इंडिया फाऊंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे प्रदान करण्यात आली.
                याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपआयुक्त योगेश कडुस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी ऋतिका संखे, ॲमेझॉनचे शरद अगरवाल, कन्सर्न इंडियाच्या कविता शहा, ॲना जॉय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ॲमेझॉनमार्फत एन. 95 व इतर विविध प्रकारचे मास्क, हँड सॅनिटायझर्स, 5 थर्मल स्कॅनर्स, 5 पेडस्ट्रल फॅन्स, 8 कार्डिॲक मॉनिटर, 11 विविध प्रकारचे व्हेन्टिलेटर्स, 50 सिरींज पम्पस्, अत्याधुनिक पेशंट मॉनिटर सिस्टिम अशी विविध प्रकारची वस्तुरूपातील मदत करण्यात आली असून आज रूग्णवाहिका देखील देण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे कोव्हिड विरोधातील लढ्यात अत्यंत गरजेच्या असलेल्या साहित्य स्वरूपातील मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ॲमेझॉन करीत असल्याबद्दल प्रशंसा करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कन्सर्न इंडिया फाऊंडेशनच्या समन्वयातून नवी मुंबई महानगरपालिकेस हे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. 


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image