गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 
नवी मुंबई - गणपती विसर्जनासाठी वापरात असलेल्या तराफावर बसलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुर्भे या ठिकाणी घडली आहे.या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
                  निलेश उंदीर पाटील (२८) असे मयत तरुणाचे नाव आहे.तो सानपाडा या ठिकाणी राहणार आहे.त्याला दारू पिण्याचे व्यसन असून अनेकवेळा रात्रभर बाहेर फिरत असल्याचीही माहिती प्राप्त झाल्याची माहिती एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.गुरुवारी ७ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर रात्री १२ नंतर तलावाजवळील सर्व कर्मचारी निघून गेले.त्या नंतर त्या ठिकाणी कोणीही नव्हते.गणपती विसर्जनासाठी वापरात असलेले तराफ ही एका बाजूला लावून ठेवण्यात आले होते.असे असतांना रात्री ३ च्या सुमारास त्या ठिकाणी निलेश आला असता तो तराफावर जाऊन बसला.ह्ळुहूळु तो तलावात सरकत गेल्याने अचानक त्याचा तोल गेला आणि तो तलावात बुडाला.ही घटना काही जणांनी बघितली असता तत्काळ ही माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली.या माहितीच्या आधारे अग्निशनम दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.व निलेश चा शोध घेतला.काही वेळात त्याचा शोध लागला असता त्याचा मृत्यू झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.निलेश च्या पालकांना सदरील घटना समजली असता त्यांनीही तत्काळ घटनस्थळी धाव घेतली.त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्याला रात्री फिरायची सवय होती अशी माहिती पोलिसांना मिळाली.मात्र तो तलावात का गेला याचा अजून तपास लागलेला नसून त्याचीही चौकशी सुरु असल्याचे निकम यांनी सांगितले.


 


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image