सासूची हत्या करणाऱ्या जावयाला १२ तासात अटक 

नवी मुंबई - जावयाने सासूची हत्या केल्याची घटना रविवारी तळोजा मध्ये उघडकीस आली असता पोलिसांनी अवघ्या १२ तासात जावयाला अटक केली आहे.त्याला पत्नीचे सतत आईकडे जाणे,त्याचबरोबर सतत टोमणे मारणे याचा राग अनावरण झाला होता.बुधवारी त्या जावयाला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा चौकशी करण्यात येईल असे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले.
                      तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील मेट्रो पॉईंट ,रम नं २०३ ,प्लॉट नं ४० ,सेक्टर ११ ,फेज १ या ठिकाणी रविवारी एक महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी त्या महिलेचा कोणीतरी गळा चिरून हत्या केली असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.यावर अज्ञात इसमावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुन्ह्यांचा शोध सुरु केला.तपास सुरु असतांना कोणीतरी जवळच्याच इसमाने हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आला.या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला.त्याचदरम्यान मयत महिलेच्या जावयाची चौकशी केली असता पोलिसांचा संशय अधिकच वाढला.दोन वर्षांपूर्वी जावयाने मयत महिलेच्या इच्छेविरोधात तिच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता.त्यामुळे मयत महिला जावयाला सतत टोमणे मारत होती.याचा राग त्याच्या मनात असतांना पत्नीही सतत तिच्या आईकडे जात असल्याचा रागही त्याच्या मनात होता.रविवारी दिवसभर पत्नी तिच्या आईकडे गेली असता जावयाचा राग अनावर झाला.आणि त्याने सासूच्या घरी जाऊन तिची हत्या केली.त्यानंतर त्या ठिकाणाहून त्याने पळ काढला असता अवघ्या १२ तासात पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि सासूची हत्या करणाऱ्या जावयाला ताब्यात घेतले.