नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6 कोव्हीड सुविधांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन लोकार्पण 


नवी मुंबई - "चेस द व्हायरस" मोहिमेंतर्गत या पुढील काळात प्रत्येकाने अधिक काळजी घेत माझ्यामुळे माझे कुटुंब कोरोना बाधीत होता कामा नये याची काळजी घेऊन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमित हात धुणे, डोळे नाक व तोंडाला हात न लावणे, घरात आल्यानंतर लहानपणीच्या सवयीप्रमाणे हातपाय धुणे व कपडे बदलणे अशा साध्या साध्या पण महत्वाच्या गोष्टींची स्वयंशिस्त पाळली पाहिजे यादृष्टीने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उत्कृष्ट असून तेथील उपचारांबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
                    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अत्याधुनिक आर.टी.-पी-सी-आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा, 200 आयसीयू बेड्ससह 80 व्हेंटीलेटर्सची सुविधा, 3 ठिकाणी 1003 ऑक्सिजन बेड्सची सुविधा असणारी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्स तसेच ऐरोली येथील 302 बेड़्सचे कोव्हीड केअर सेंटर अशा 6 सुविधांच्या ऑनलाईन लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपिन कुमार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने 80 टक्के ऑक्सिजन रुग्णालयांकरीता व 20 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी देण्याचा निर्णय घेतला असून त्याचे वितरण केंद्रीय पध्दतीने होणार असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार बेड्स तसेच प्रयोगशाळाही वाढविण्यात आल्या असून उपचार सुविधा वाढविताना त्यांचा उपयोग ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांकरिता होईल याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना केल्या.याप्रसंगी बोलताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड उपाययोजनांबाबत चांगले काम करीत असल्याचे नमूद केले. 15 लाख लोकसंख्येमध्ये 1.5 लाखाहून अधिक टेस्टिंग केल्याचे नमूद करीत 25 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व हे प्रमाण 86 टक्के इतके चांगले आहे असे ते म्हणाले. मृत्यू दरातही घट झाली असून तो 2.19 इतका आहे. हे चांगले संकेत असले तरी कोणत्याही प्रकारे गाफील न रहाता रुग्ण शोध वाढवून अधिक दक्षतेने काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी 'मिशन ब्रेक दे चेन' अंतर्गत टेस्ट, आयसोलेट, ट्रिट या त्रिसूत्रीच्या आधारे करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांनुसार 'मिशन झिरो' साठी यापुढील काळात अधिक प्रभावीपणे काम केले जाईल व 3.3 वरून 2.19 पर्यंत खाली आलेला मृत्यू दर आणखी कमी करीत शून्यावर आणण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी "मिशन ब्रेक द चेन" हाती घेऊन "टेस्ट, आयसोलेट, ट्रिट" या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी, जलद रुग्णशोधासाठी चाचण्यांच्या संख्यावाढीवर भर, 22 टेस्टिंग केंद्रे तसेच सोसायट्यांमध्ये जाऊन 34 मोबाईल व्हॅनव्दारे अँटिजन टेस्टींगवर भर, शहराच्या 15 लाख लोकसंख्येमधून 1 लक्ष 50 हजार 175 व्यक्तींचे कोव्हीड 19 टेस्टींग पूर्ण, मृत्यूदरात लक्षणीय घट (मागील 1 महिन्यातील मृत्यूदर 1.56) (एकूण मृत्यूदर 3.54 वरून 2.19 ), अत्याधुनिक आर.टी. - पी.सी.आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा, नेरुळ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वत:ची अद्ययावत अशी संपूर्ण स्वयंचलित आर.टी.पी.सी.आर.चाचणी व निदान प्रयोगशाळा, केवळ 11 दिवसात आय.सी.एम.आर. शासकीय परवानगीसह कार्यान्वित, प्रतिदिन 1000 चाचण्यांची क्षमता, आर.एन.ए. एक्स्ट्रॅक्शन तसेच आर.टी.-पी.सी.आर. मशीन स्वयंचलित असल्याने रिपोर्ट जलद प्राप्त,प्रयोगशाळेत प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट उपलब्ध करून देण्यात आल्याने कर्मचा-यांना संसर्ग होण्याचा धोका टाळला जात आहे.


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image