ऐरोलीतील लेवा पाटीदार सभागृहात नविन कोविड सेंटरची निर्मिती

नवी मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऐरोलीत नविन कोरोना सेंटर उभारण्यासाठी आमदार गणेश नाईक सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यानुसार पालिकेने ऐरोलीतील सेक्टर १५ मध्ये असलेल्या लेवा पाटीदार सभागृहात नविन कोविड सेंटरची निर्मिती केली करण्यात आली आहे.या सेंटरची रविवारी नाईक यांनी पाहणी करुन सकृतदर्शनी येथील व्यवस्था समाधानकारक असल्याची प्रतिक्रीया नोंदवली.
                 ऐरोली नोडमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. त्यादृष्टीने हे नविन कोविड सेंटर रुग्णांना अलगिकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. लेवा पाटीदार सभागृहाच्या तीन मजल्यांवर एकुण ३०२ खाटांचे हे सेेंटर असून त्याचे काम पुर्ण होत आले आहे. केवळ खाटा म्हणजे क्वारंटाईन सेंटर नसून त्यामधून उपचाराच्या व इतर आवश्यक चांगल्या सुविधा मिळणे अपेक्षित असल्याचे मत नाईक यांनी याप्रसंगी मांडले. ऐरोलीसह नवी मुंबईत कोविड बाधितांचे आकडे वाढत आहेत. यावर आपले निरिक्षण नोंदवताना ते म्हणाले, ‘नवी मुंबईकर समंजस आहेत. त्यांना या महामारीचे गांभीर्य कळते मात्र सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न लावणे, सॅनिटायझर न वापरणे काही घटकांच्या अशाप्रकारच्या  बेफिकरी वृत्तीमुळे या रोगाचा संसर्ग वाढतो आहे.वाशीतील पालिकेचे कोविड रुग्णालय, सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड सेंटर यांना वेळोवेळी भेटी देवून नाईक यांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपयुक्त सुचना केल्या आहेत. पालिका आयुक्तांबरोबर ते प्रत्येक आठवडयाला एक आढावा बैठक घेत असतात. त्यांनी केलेल्या सुचनांवर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही देखील  केली आहे. कंत्राटी, ठोक, कायमस्वरुपी कोविडचे काम करणारे कर्मचारी व अधिकार्‍यांना विम्याचे सुरक्षा कवच प्रदान केले आहे. खाजगी रुग्णालयात आयसीयू आणि व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध केले आहेत. कोविड नियंत्रणातील उणिवा प्रशासनाच्या लक्षात आणून देतानाच नाईक हे प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही करतात.या पाहणी दौर्‍याप्रसंगी माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक,माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते,दिनेश पारख,ऍड. जब्बार खान ,दीपक पाटील,सुदर्शन जिरंगे,कैलाश सुकाळे, ऍड. संध्या सावंत,अनिल नाकते,कैलाश गायकर,शिवाजी खोपडे, नरेंद्र कोटकर,भरत मढवी,बाबूलाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


नाहीतर पुढच्या वेळेस उग्र आंदोलन
शहरातील रस्त्यांवर मोठया संख्येने पडलेल्या खडडयांविरोधात गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला यापूर्वीच इशारा दिला आहे. ऐरोलीतील कोविड सेटरची पाहणी केल्यानंतर त्यांनी ऐरोली-मुलुंड उडडाणपूलाजवळील दिवा-कोळीवाडा येथील रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरही खडडेच खडडे पडले आहेत. येथील खांबावरील बल्ब उडाले आहेत. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. अपघात होत असतात. शहरातील सर्व रस्त्यांवरील खडडे तातडीने संबधित प्राधिकरणांबरोबर बोलून दुरुस्त करुन घ्या अन्यथा पुढच्या वेळेस उग्र आंदोलन करण्यासाठीच येवू, असा इशारा त्यांनी यावेळेस पालिका अधिकार्‍यांना दिला.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image