दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु
नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
नवी मुंबई :- नेरुळ विभाग कार्यालय हद्दीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सारसोळे गाव,मिर्झा अपार्टमेंट प्लॉट नंबर ४१४ च्या बाजूला असलेल्या अनधिकृत इमारतीवर काही दिवसांपूर्वी सिडकोकडून तोडकं कारवाई करण्यात आली होती.तर त्यापूर्वी एकदा नेरुळ विभाग कार्यालयाकडून ही तोडकं कारवाई करण्यात आली होती.या कारवायांना काही दिवस उलटत नाही तोच बांधकाम धारकाने पुन्हा बांधकाम सुरु केले आहे.इमारतीचा जो भाग तोडण्यात आला होता,त्या भागाला डागडुजी करून बांधकाम धारकाने पुन्हा बांधकाम सुरु केले आहे.सदरील बाब नेरुळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणूनही विभाग कार्यालय शांत असलयाने अखेर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मनपा अधिकाऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे आजतायागत शेकडो कुटुंब बेघर झाले असून अजून किती जणांचा जाणार हे सांगता येत नाही.सिडको व महापालिका अतिक्रमण विभाग हे नेहमी अर्धवट कारवाया करत असल्याने त्यातून त्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जातात की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती सध्या स्थितीत निर्माण झाली आहे.