अनधिकृत रस्ता बनवणाऱ्या शोरूम धारकांना बांधकाम विभागाचा दणका

 


नवी मुंबई  - सायन - पनवेल महामार्गावरील कोपरा गावालगत असलेल्या शोरूम धारकांनी अनधिकृत रस्ता तयार त्याचा वाहनांच्या येण्याजाण्यासाठी वापर सुरु केल्याने त्याना बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे.शोरूम धारकांच्या या अतिक्रमणाने भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यताही बांधकाम विभागाने वर्तवली आहे. आठ दिवसांच्या आत जर शोरूम धारकांनी अनधिकृत रस्ता बंद केला नाही तर शासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असा इशारा बांधकाम विभागाने दिला आहे.

                 सायन - पनवेल महामार्गावरील कोपरा गावालगत मारुती सुझिकी ऐरना ,कमल हुंडाई शोरूम व नेकसा सीमरन मोटर्स ,निहारिका हे ते मोठे शोरूम आहेत.या तिन्ही शोरूम धारकांनी शोरूमच्या समोरील जागेचा गैरवापर करत त्या जागेवर रस्ता आणि पार्किंग ठिकाण बनवले आहे.या मुळे या रस्त्यावर तसेच शोर मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली.त्यातच शोरूम मध्ये येणारे बहुतांश ग्राहक हे सायन - पनवेल महामार्गावरील मुख्य रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसून आले आहे.या प्रकरणी स्थानिक प्रकल्पगस्त विजय मयेकर यांनी मुंबई रस्ते बांधकाम विभाग कार्यालयाकडे तक्रार केली असता या विभागाने तिन्ही शोरूम धारकांना नोटीस बजावली आहे.सायन - पनवेल महामार्गावरील रस्त्यालगत एक मोठे गटार असून त्याच गटारावर या सर्वानी अनधिकृतपणे रस्ता तयार करून त्याचा वापर सुरु केल्याने बांधकाम विभागाने त्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.त्या नंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Popular posts
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image