भाडेतत्वावर गाड्या घेऊन त्याची विक्री करणाऱ्या टोळीला अटक


 भाडेतत्वावर गाड्या घेऊन त्याची विक्री करणाऱ्या टोळीला अटक 

नवी मुंबई - कॉर्पोरेट कंपनी व हॉटेल मध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेऊन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.या टोळीकडून तब्बल दोन करोड रुपये किमतीची वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

                    सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा उर्फ बाबू (३०),आशिष गंगाराम पुजारी (३२) व अयान उर्फ राहुल उर्फ अँथोनी पॉल छेत्तीयर (३८) मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख (३३) व जावेद अब्दुलसत्तर शेख (४६) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.यातील अयान छेत्तीयर हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून तो बंगलोर मध्ये राहून दुबई येथील मोबाईल कंपनीचे सिमकार्ड वापरून व्हाट्सअप कॉल च्या माध्यमातून नियोजनबद्ध रॆकेट चालवत होता.या गुन्हेगारांची आंतरराज्यीय टोळी असून त्यांनी अनेक ठिकाणी कार्यालये स्थापन करून त्यांनी शेकडो वाहन मालकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.नेरुळ पोलीस ठाणे मधील गुन्ह्यातील १६ वाहनांपॆकी सुमारे ८१ लाख रुपये किमतीची ९ वाहने गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दारू तस्करीमध्ये जप्त केले असल्याचा शोध घेतला असून नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये आता पर्यंत २ कोटी २ लाख रुपये किमतीची वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.या टोळीने नेरुळ मध्ये ट्रॅव्हल्स पॉईंट या कंपनीच्या नावाने ऑफिस सुरु केले होते.या ठिकाणी  वाहन चालकांसोबत भाडे करार करून ती वाहने मूळ कागदपत्रासह घेऊन परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा शोध पोलिसांनी घेतला असता त्यांना सत्यप्रकाश वर्मा हा भोईसर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणी जाऊन सात दिवस पाळत ठेवली आणि त्यानंतर त्याला अटक केली.त्याच्याकडे त्याच्या साथीदारांची माहिती घेतली असता त्याचा साथीदार आशिष पुजारी व पॉल हे बंगलोर मध्ये असल्याची माहिती समोर आली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना बंगलोर मधील एका हॉटेल मधून अटक केली.हे दोघेही हॉटेल मध्ये वेटरचा वेष परिधान करून राहत होते.यांनी ज्यांना चोरीच्या गाड्या विकल्या होत्या त्यांनाही माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली.वरील आरोपी हे वेगवेगळ्या नावाने विविध ठिकाणी ऑफिस खुले करून त्या ठिकाणी ४ ते ५ जण कामाला ठेवत होते.त्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी करून गाड्या भाड्याने घेणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याबरोबर वाहन भाडेकरार करून त्यांच्याकडून वाहनांची मूळ कागदपत्रे व वाहन ताब्यात घेत आणि त्याच वेळी त्यांचे मासिक भाडेही सुरु करत.त्या नंतर त्या गाड्या परराज्यात कमी किमतीत विकत असत.विक्री करून झालेल्या गाड्यांचे पैसे इतर वाहन धारकांना मासिक भाडे स्वरूपात देऊन ऑफिस कमीतकमी ३ ते ४ महिने चालवत असत.जर अश्याच प्रकारे अजून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आव्हान नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी केले आहे.

Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image