महापरिनिर्वाण दिनी डॉ.आंबेडकरांना घरुनच अभिवादन करा - राज्यमंत्री संजय बनसोडे


नवी मुंबई - महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. दरवर्षी सातत्याने भीमानुयायांचा जनसागर भारताच्या कानाकोपऱ्यातून या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी भिमानुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून आपल्या आचरणाने आणि कृतीतून घरातूनच अभिवादन करावे, हीच खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

              बनसोडे म्हणाले की, येणारा ६ डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. समाजाप्रती त्यांचे कार्य आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी देशभरातून भिमानुयायी आस्थेने येत असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न देखील आहेत.ते आम्हा साऱ्यांचे आदर्श असून आम्हीही त्यांचे अनुयायी आहोत. समाजात समानता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आजीवन संघर्ष केला. अन्याया विरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर भारताचे संविधान निर्माण करून देशाला कायदे, अटी, नियम, आचारसंहिता घालून दिल्या. असे असताना ज्या महामानवाने संविधान निर्माण केले त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात जनतेचा जीव धोक्यात घालणे अनुचित ठरेल. म्हणूनच, ही वेळ आहे आपल्या आचरणातून एक सुजाण नागरिक असल्याची प्रगल्भता दाखविण्याची. आजही कोविडचा धोका आहे, तो नष्ट झाला असे मानणे चूक आहे. चैत्यभुमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. यापुर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image