भाजपकडून स्वस्त दरात दिवाळी फराळाच्या वस्तूचे वाटप

नवी मुंबई - यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचा आर्थिक कहर असल्याने त्यावर काही प्रमाणात दिलासा म्हणून भाजपने आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.यासाठी चांगल्या आणि उच्च दर्जाच्या दिवाळी फराळाच्या वस्तूची निवड करत त्या वस्तू अर्ध्या किमतीत देण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 79 यांच्यावतीने करण्यात आला आहे.या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने अर्ध्या किमतीत का होईना पण गरजेपोटी लागणारे पूर्ण सामान आम्हाला मिळाल्याचा दिलासा नागरिकांनी व्यक्त केला आहे.नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता असे उपक्रम वेळोवेळो राबवण्यात येतील असे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ आबासाहेब जगताप यांनी सांगितले.
                       कोरोना काळात बहुतांश नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले असल्याने दिवाळीवर दुःखाचे संकट पसरले आहेत.याच दुःखाच्या संकटावर काही प्रमाणात सुखाची फुंकर घालण्यासाठी अनेक राजकीय आणि सामाजिक पक्ष सरसावले आहेत.अनेक ठिकाणी दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या वस्तू देण्यात येत असून त्यापासूनही अनेक जण वंचित आहेत.याचाच विचार करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ आबासाहेब जगताप यांनी नागरीकांना अर्ध्या किमतीत दिवाळी फराळासाठी लागणारे परिपूर्ण साहित्य देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे स्वागतच प्रभाग क्रमांक ७९ मधील नागरिकांनी केले असता तसा त्यांना प्रतिसादही दिला.यात शिवशक्ती सोसायटी, नव प्रेरणा सोसायटी ,येशश्री प्लाझा सोसायटी, सुयोग सृष्टी सोसायटी ,शिव त्रिवेणी गॅलरीया सोसायटी ,अष्टविनायक सोसायटी, पंचम मंगलमूर्ती सोसायटी, प्रियांका दर्शन सोसायटी, रिधम कोऑपरेटिव सोसायटी यासह अनेक सोसायट्यांच्या सहभाग आहे.या सोसायटीमध्ये स्वस्त दरात दिवाळीचे फराळाचे साहित्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ आबासाहेब जगताप यांच्या हस्ते वाटण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष श्रीमंत जगताप रमेश जी शेटे, चंद्रकांत सरनोबत, बाळासाहेब हांडे, नवनाथ सुतार, सुनील जी नाईक, संभाजी सपकाळ, राजेश गायकवाड, भारती मोरे, निताजी आंग्रे, दीपिका बामणे, सर्व सोसायटीचे सभासद पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते.  


Popular posts
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एम आय डी सी कडून नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप - चौकशीची मागणी 
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य
Image