बेकायदेशीर मोबाईल टॉवर विरोधात तुर्भेतील नागरिक आक्रमक


नवी मुंबई - तुर्भे मधील शिवशक्ती नगर मध्ये एका इमारतीवर बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून त्याचा त्रास त्याच्या लगतच असलेल्या शाळा तर नागरिकांना होऊ लागला आहे.त्यामुळे सदरील मोबाईल टॉवर तत्काळ काढण्यात यावा अशी मागणी तुर्भे स्टोर मधील भाजप वार्ड अध्यक्ष संतोष राठोड यांनी तुर्भे पोलिसांकडे लेखी स्वरूपात केली आहे.या टॉवरवर कारवाई करून नागरिकांना त्रास मुक्त करण्यात यावे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
                     तुर्भे शिवशक्ती नगर मधील इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारीच असलेल्या एका इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून त्या नंतर शाळा क्रमांक २२ डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या माघे व समता हिंदी विद्यालय शाळे समोर असे एकूण तीन मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे.या मोबाईल टॉवर मध्ये विभागातील नागरिकांना ह्दय विकाराचे आजार,महिलांच्या गर्भाशयाला होणारे आजार,लहान मुलांच्या डोळ्यावर परिणाम असे परिणाम होत आहेत.त्यामुळे सदरील मोबाईल टॉवर तत्काळ हटवणे गरजेचे आहे असे राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image