चार्मिंग प्रिन्स अंड प्रिन्सेस इंडिया सौंदर्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई - वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृह मध्ये गुरमीत गारा ग्रुमिंग स्कूल आयोजित चार्मिंग प्रिन्स अंड प्रिन्सेस इंडिया या सौंदर्यस्पर्धा च्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला.मोठ्या संख्येने युवक युवतीने या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व प्रमुख परिक्षिक म्हणून २०१६ चे मिस्टर वर्ड विजेते रोहित खंडेलवाल उपस्थित होते.

                स्पर्धेचे मुख्य आयोजक गुरमित गारा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की "गेली चार वर्ष या सौंदर्य स्पर्धेचे आम्ही यशस्वी आयोजन करीत आहोत.आमच्या डोळ्यासमोर हेच एक उद्दिष्ट होते की स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला एक व्यासपीठ निर्माण व्हावे, त्यांच्यात असलेल्या कलेला प्रोत्साहन मिळावे.यशस्वी करण्यासाठी सर्वच तिने खूप मेहनत घेतली" या सौंदर्यस्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता प्रोॲक्टीव शिफ मॅनेजमेंट प्रा .लि. कंपनी के सर्वेसर्वा प्रसन्नजित कुमार आणि सोमय्या सिंग विशेष उपस्थित होते.कार्यक्रमाचे शो दिग्दर्शन ऋषिकेश मिराजकर यांनी केले. स्पर्धेला यशस्वीरित्या सादर करण्याकरिता पाहूलदिप गारा यांनी क्रियेटिव्ह दिग्दर्शक काम बघितले. एस के ग्रुपचे सर्वेसर्वा डॉ संजीव कुमार, डॉ.विजय शुक्ला,निर्माता संदीप नगराळे व इतर मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेचे विजेते अश्वत गायकवाड, भावी घाडीगांवकर, क्रिष पनवेलकर, पलक सिंग, किशोर कुमार, श्रुष्टी बन्नाटी ठरलेत. गुरमीत गारा ग्रूमिंग स्कूल च्या अध्यक्षा सिया गारा आनंद व्यक्त करीत सांगितले की ज्या प्रमाणे या वर्षी आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानुसार आम्ही पुढच्या वर्षी ही स्पर्धा देशपातळीवर घेऊन जाणार आहोत. 

Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image