नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत देण्यासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद करा - आ. गणेश नाईक

नवी मुंबई - अर्थसंकल्पात मालमत्ता कर किंवा पाणीपटटीत कोणतीही वाढ करू नये,अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.त्याच बरोबर नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत देण्यासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद या बजेटमध्ये करावी,अशी महत्वाची मागणी देखील त्यांनी केली आहे.पालिकेचा अर्थसंकल्प तयार होत आहे.या अर्थसंकल्पासाठी नाईक यांनी नवी मुंबईतील विकासाच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण सुचना केल्या आहेत. यामध्ये विकास कामांसोबतच नागरिकांच्या हिताच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या सुचनांचे निवेदन बुधवारी माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेेते दशरथ भगत, माजी नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेवक डाॅ. जयाजी नाथ, नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक सुनिल पाटील आदीं मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. या सुचनांचा समावेष येत्या बजेटमध्ये करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली.

                     मागील 20 वर्षे महापालिकेने एकदाही  मालमत्ता कर आणि पाणीपटटीत वाढ केली नाही.यापुढील पाच वर्षे देखील प्राॅपर्टी आणि वाॅटर टॅक्समध्ये कोणतीही वाढ करू नये,यासाठी नाईक आग्रही आहेत. नवी मुंबई पालिकेत सध्या आयुक्त बांगर हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्त्विात आल्यानंतर बजेटमध्ये आवश्यक विकासकामांना आणि जन कल्याणाच्या योजनांसाठी निधीची तरतूद अगोदरच केलेली असावी, याकरीता सुचनांचे निवेदन आयुक्तांना दिल्याचे माजी महापौर सुतार म्हणाले. कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजचे खर्च भागवताना नाकीनउ येते आहे. अशा संकटकाळात नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकणे योग्य होणार नाही. ज्या प्रमाणे मागील 20 वर्षे मालमत्ता व पाणीकर न वाढवता जनतेला दिलासा देण्यात आला आहे त्याप्रमाणे यंदाच्या बजेटमध्ये देखील दिलासा द्यावा असे नमूद करून अन्य स्त्रोत शोधून त्यामधून पालिकेने आपले उत्पन्न वाढवावे, असा सल्ला लोकनेते आ. नाईक यांनी दिला आहे.सर्व नवी मुंबईकरांना मोफत कोविड 19 ची लस द्यावी, अषी मागणी लोकनेते आ. नाईक यांनी सुरूवातीपासून केली आहे. आता कोरोना लस खरेदीसाठी पालिकेेने अर्थसंकल्पात 150 कोटी रूपयांची तरतूद करावी, अषी सुचना केली आहे. कोविड योध्यांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले असून सध्या अत्यावष्यक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. यानंतर सर्वसामान्यांना लसीकरण केले जाणार आहे. मात्र प्रती व्यक्ती एक हजार रूपये खर्चून कोरोनाच्या संकटकाळात लस घेणे परवडणारे नाही. त्यामुळे महापालिकेनेच ही लस सर्वांना मोफत द्यावी आणि आपली जन कल्याणकारी जबाबदारी पार पाडावी. या दोन महत्वाच्या मागण्यांसह लोकनेते आ.नाईक यांनी भविष्यात नवी मुंबईत आवष्यक पायाभूत, दळणवळणाची कामे, नागरी सुविधा, भविष्यातील षहराच्या गरजांनुसार सांप्रत काळात हाती घ्यावयाचे प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, परिवहन सेवा, महिला, युवक व ज्येष्ठांच्या कल्याणाच्या योजना इत्यादी विषयी त्यांच्या दुरदर्षी विकास धोरणांनुसार मौलिक सुचना केलेल्या आहेत. या सुचना उपयुक्त असून त्यांचा निष्चितच विचार केला जाईल, असे मत आयुक्त बांगर यांनी यावेळी मांडले.


Popular posts
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image