कंत्राट दाराकडून सफाई कामगारांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण, मनपाचा कारवाईचा इशारा


नवी मुंबई - कंत्राटी कामगारांना मनपाच्या नियमानुसार विविध सुविधा तसेच वागणूक देणे गरजेचे असतांनाही घणसोली मधील निलेश एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.त्याचबरोबर कामगारांना सुविधाही मिळत नसून कामगारांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरणही करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.या संबधी गेल्या अनेक वर्षातील त्या कंत्राटदारांचे सर्व कामगारांना सुविधा देण्यासंदर्भातील कागदपत्रे तपासण्यात येणार असून त्या नंतर आम्ही आमची भूमिका पार पाडू अशी माहिती मनपा उपायुक्त बाबासाहेब रांजळे यांनी दिली आहे.तर कामगारांवर होणार अन्याय कदापी सहन केला जाणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा समता समाज कामगार संघाचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी दिला आहे.

               घणसोली गट क्रमांक ७० मध्ये एकूण ५७ सफाई कामगार आहेत.हे सर्व कामगार निलेश पाटील या कंत्राटदाराच्या निलेश एन्टरप्रायझेस या अंतर्गत काम करत असत त्यांच्या मनमानी कारभाराला त्रस्त झाले आहेत.कामगारांना मिळणारा पगार हा ऑनलाईन ट्रांन्सफर अथवा चेकने देण्याची तरतूद असूनही गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांना पगार रोखीने देण्यात येत असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.तसेच ५७ कामगार त्या ठिकाणी रजिस्टर दिसत असले तरी मुळात ३० कामगार कार्यरत असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.इतर कामगारांचा पगार हा असाच हडप केला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.कामगार कमी असल्याने इतर कामगारांवर कामाचा ताण येत असल्याने प्रभागातही अस्वछता दिसून येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.या गटात काम करणाऱ्या महिलांनाही कंत्राटदाराकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असून कामावर येणाऱ्या महिलांची काम करूनही अनेक दिवस हजेरी लावली जात असल्याची माहिती समोर आली आहे.तुम्ही या ठिकाणी काम करू नका,दुसऱ्या गटात काम करा या साठी दबाव टाकण्यात येत असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले आहे.अश्या कंत्राटदाराला वेळीच लगाम लावले नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक खच्चीकरणही होईल असा इशारा कामगारांनी दिला आहे.

कोट - निलेश एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार आम्ही मनपा आयुक्तांसमोर मांडला आहे.या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याना चौकशीचे आदेशही दिले आहेत.त्याची अमंलबजावणी कधी होते याची आम्हाला प्रतीक्षा आहे.

गजानन भोईर - अध्यक्ष ,समाज समता कामगार संघ 

कोट - निलेश एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराची तक्रार आमच्याकडे आली असून मी स्वतःह त्या गटावर जाऊन चौकशी करून आलोय.कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भातील कागदपत्रे कंत्राटदाराकडून मागवण्यात आली असून त्याची तपासणी होताच योग्य ती भूमिका घेण्यात येईल. 

बाबासाहेब राजळे - उपायुक्त ,घनकचरा विभाग नवी मुंबई 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image