आता कोव्हीड लसीकरणाविषयीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध, https://www.nmmccovidcare.com या विशेष पोर्टलवर सुविधा

नवी मुंबई - संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याकडे नवी मुंबई महानगरपलिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका क्षेत्रात सध्या 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून अधिक लस साठा उपलब्ध झाल्यास लसीकरणाला गती देण्याच्या दृष्टीने शंभराहून अधिक लसीकरण केंद्रे लगेच कार्यान्वित करण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुस-या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणा-या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे.

                       याशिवाय नागरिकांना लसीकरणाविषयीची माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी अशा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmccovidcare.com या विशेष पोर्टलवर कोव्हीड 19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.आता नागरिक https://www.nmmccovidcare.com या वेबसाईटवरील COVID-19 VACCINATION या सेक्शनवर क्लिक करून महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात व त्यानुसार आपल्या लसीकरणाचे नियोजन करू शकतात.विशेष म्हणजे नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.दररोज संध्याकाळी 7 वा. दुस-या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असून नागरिक पोर्टलला भेट देऊन त्यानुसार आपल्या लसीकरणाचे सुलभपणे नियोजन करू शकतात.या https://www.nmmccovidcare.com पोर्टलवरून यापूर्वीच महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्टींग केंद्रांवर केलेल्या कोव्हीड टेस्ट्सचा रिपोर्ट COVID-19 TEST REPORTS सेक्शनमध्ये सहजपणे उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.त्याच https://www.nmmccovidcare.com पोर्टलवर आता दररोजच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती एका क्लिकव्दारे समजणार असल्याने नागरिकांना हे अत्यंत सुविधाजनक होणार आहे. नागरिक अगदी आपल्या हातातील मोबाईलवरूनही लसीकरणाविषयीची माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुलभपणे व गतीमानतेने लसीकरण व्हावे याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून लस खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात लस उपलब्ध होतील त्यानुसार कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीचे ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड व्यक्ती, ४५ वर्षावरील नागरिक यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यासोबतच ज्यांचा दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संपर्क येतो असे मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, सोसायटी वॉचमन, पेट्रोल पंपवरील कर्मचारी अशा पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. याशिवाय बेघर निराधार व्यक्ती, रेडलाईट एरिआ, दुर्गम कॉरी क्षेत्र येथील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडेही लक्ष देण्यात आलेले आहे.आत्तापर्यंत 6 लक्ष 22 हजार 407 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 1 लक्ष 70 हजार 417 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अशाप्रकारे एकूण 7 लक्ष 92 हजार 824 इतके कोव्हीड लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.जास्तीत जास्त नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट असून नागरिकांना लसीकरणाची माहिती विनासायास सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध सुविधा निर्माण करीत महानगरपालिका प्रयत्नशील आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी https://www.nmmccovidcare.com या पोर्टलवरील COVID-19 VACCINATION या सेक्शनमध्ये जाऊन कोव्हीड लसीकरणाची अद्ययावत माहिती जाणून घ्यावी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.