प्रतीक्षा (वेटिंग) यादीवरील सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेना आक्रमक

नवी मुंबई :- वाढती महागाई त्यातच कामाची टंचाईने त्रस्त असलेल्या प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेना आक्रमक झाली आहे.बुधवारी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांची भेट घेतली असता यावर प्रश्न उपस्थित केला.आम्ही आपणास नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापना निदर्शनास आणून देऊ,तुम्ही त्यावर कारवाई करून प्रतीक्षा यादीवरील रक्षक नेमा अशी मागणी केली असता डोके यांनी या प्रश्नाला सकारात्मक दुजोरा दिला.प्रतीक्षा यादीवरील रक्षक आम्हीही कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले असल्याचे राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.

                     यावेळी समस्यांचे निवेदन डोके यांना देण्यात आले,त्यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण,कार्याध्यक्ष प्रकाश कोळी,सरचिटणीस चंद्रकांत धडके,सल्लागार डॉ गोरख बोबडे, सहचिटणीस सचिन लोखंडे,सुनील वरेकर,नवी मुंबई उपाध्यक्ष डॅनी डिसोझा व राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप माने,सहसचिव भाऊराव आसवले, सुनील पाटील, सचिन शिंदे, मनीषा रोहम, वैशाली नवले, दीपाली वाघमारे उपस्थित होत्या.या मागणीसह अजून काही मागण्या डोके यांच्यासमोर मांडण्यात आल्या.त्यात सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा बोर्डात चार हजारच्या जवळपास सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीवर आहेत.त्यांना काम मिळेल या दृष्टिकोनातून तरतूद करणे.,सुरक्षा पर्यवेक्षक यांच्याकडून सुरक्षा रक्षकांना होणार त्रास थांबवण्यात यावा, बँक टू बोर्ड संकल्पना बंद करणेबाबत,ज्या कामगाराची तक्रार असेल त्याची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, महिलांना गणवेश स्वरूपात ज्या साड्या देण्यात आल्या आहेत त्या बदलण्यात याव्यात, ज्या आस्थापना बोर्डात नोंदीत असूनही आपले रक्षक ठेवत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, सुरक्षा रक्षकांना शिस्त आणि कामात कणखरपणा यावा यासाठी माजी सैनिक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.,बोर्डातील अधिकाऱ्यांची सुरक्षा रक्षकांप्रती वागणूक चांगली नसून त्यांना योग्य ती वागणूक देण्याची समज देण्यात यावी.,कामात हलगर्जीपणा तसेच कामचुकारपणा करणाऱ्या कामगारांवर कारवाई करण्यात यावी, वेटिंग मारण्यासाठी येणाऱ्या कामगारांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात त्याचवेळी यादरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी ही करण्यात यावी, डी रजिस्टर कामगारांचा घेण्यात येणारा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेणे गरजेचे असतांना तो बोर्ड अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात येतो अशी माहिती मिळत असून त्यावर योग्य माहिती मिळण्यात यावी यावरही चर्चा करण्यात आली.या सर्व मागण्या डोके यांच्यासमोर मांडण्यात आल्या नंतर लवकरच आम्ही एक बैठक घेऊन तश्या सूचना करू असे त्यांनी सांगितले.


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image