रुग्णांना मिळणार 'इंटरनॅशनल सेकंड ओपिनियन' सेवा, ‘द-क्लिनिक बाय क्लीव्लॅंड क्लिनिक’ सोबत अपोलोने केला सहयोग करार

नवी मुंबई :- अपोलोने भारतात पहिल्यांदाच इंटरनॅशनल सेकंड ओपिनियन सेवा आपल्या रुग्णांसाठी सुरु करण्यासाठी 'द क्लिनिक बाय क्लीव्लॅंड क्लिनिक' सोबत भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, "रुग्णांना सर्वोत्तम देखभाल सेवा मिळण्यासाठी नवी मुंबई अपोलोमध्ये आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. आजाराच्या निदानाची खात्री करून घेण्यात आणि उपचार व्यवस्थापनाच्या नवनवीन योजना आमच्या डॉक्टरांना उपलब्ध करवून देऊन त्यांना अधिक सक्षम बनवणे हे त्याच दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे."

                 या प्रोग्रामअंतर्गत अपोलो मधील डॉक्टरांना गुंतागुंतीच्या केसेसची नीट पडताळणी करण्यासाठी आणि सर्वात सुयोग्य उपचार योजना अंमलात आणण्यासाठी क्लीव्लॅंड क्लिनिकमधील आघाडीच्या वैद्यकीय तज्ञांसोबत समन्वयपूर्वक काम करता येईल. अपोलो हॉस्पिटल्सचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ.अनुपम सिबल यांनी सांगितले, "जागतिक दर्जाच्या वैद्यकीय आणि शल्यचिकित्सीय मतांचा समन्वय घडून यावा जेणेकरून अपोलोमधील रुग्णांना संभव असलेले सर्वोत्तम उपचार, अतिशय तातडीने मिळावेत हा या सहयोगाचा उद्देश आहे."फ्रॅंक मॅकगिलिन, सीईओ, द-क्लिनिक बाय क्लीव्लॅंड क्लिनिक म्हणाले, "जगातील सर्वोत्तम क्लिनिकल नैपुण्याचा लाभ आपल्या रुग्णांना मिळावा या द क्लिनिकच्या सिद्धांताचे पूर्ण समर्थन करणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्ससोबत या उपक्रमासाठी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले, या नवीन भागीदारीमुळे भारतातील रुग्णांना अपोलो हॉस्पिटल्समधील आपल्या डॉक्टरांसोबत मिळून काम करण्यात मदत होईल, ते क्लीव्लॅंड क्लिनिकमधील डॉक्टरांच्या नैपुण्याचा अशा तऱ्हेने उपयोग करवून घेऊ शकतील की त्यांच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणारे परिणाम आणि देखभाल समन्वय या दोन्हींमध्ये वाढ होऊ शकेल."इंटरनॅशनल सेकंड ओपिनियन ज्यांना हवे असेल त्यांनी अपोलो कन्सल्टन्टशी सल्लामसलत करून ही सेवा हवी असल्याचे त्यांना सांगावे. त्यानंतर रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड्स योग्य मंजुरी घेऊन ‘द-क्लिनिक बाय क्लीव्लॅंड क्लिनिक’ कडे पाठवले जातील व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञ व अपोलो कंसल्टंट्स यांच्या दरम्यान रुग्णाच्या उपस्थितीत एक कॉन्फरन्स कॉल ठरवला जाईल.रुग्णाच्या आरोग्याची संपूर्ण माहिती आणि अपोलो कन्सल्टन्ट सोबत केसबाबत झालेली चर्चा यांच्या आधारे, आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांचे मत ठरवून ते लेखी स्वरूपात अपोलो कन्सल्टन्टना देतील. त्याच्या आधारे अपोलो कन्सल्टन्ट पुढील चर्चा करतील व रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार निश्चित करतील.

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image