मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

उरण (विठ्ठल ममताबादे) - महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाला युवकांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस रायगड जिल्हा व नवी मुंबई परिसरात मनसेला वाढता पाठींबा मिळत आहे. रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईमध्ये पक्षाचा प्रचार व प्रसार जोरात सुरु आहे. पक्ष बांधणी, पक्ष संघटनही जोरात सुरु आहे. पक्ष आणखीन मजबूत करण्याच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हीत लक्षात घेऊन शुक्रवार रोजी तेजस पनवेल येथे राजमाता जिजाऊ गड या नावाने मनसेचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

                 तसेच प्लॉट नंबर 418, कृष्णाई रेसिडेन्सी, सेक्टर 24 उलवे, नवी मुंबई येथेही मनसेच्या कार्यालयाचे उदघाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी, महिलांना न्याय देण्यासाठी पनवेल येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय सुरु करण्यात आल्याची माहिती मनसे महिला जिल्हाध्यक्ष आदिती सोनार यांनी दिली. यावेळी अमित ठाकरे यांनी पनवेलच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी तळागाळात जाऊन कार्य करण्याचा सल्ला महिलांना,पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात मनसेचे सुरु असलेले कार्य,नवीन शाखा, पक्ष प्रवेश सोहळे या बद्दल जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी माहिती दिली.यावेळी मनसे नेते राजू दादा पाटील , नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, संपर्क प्रमुख स्नेहल जाधव ,रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,जिल्हाध्यक्ष महिला सेना -अदिती सोनार, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना अक्षय काशीद, जिल्हाध्यक्ष चित्रपट सेना अक्षय सुतार,जिल्हाध्यक्ष ठाणे पालघर -अविनाश पडवळ, पनवेल तालुका अध्यक्ष वर्षा पाचभाई, पनवेल शहर अध्यक्ष प्रीती खानविलकर, पनवेल शहर उपाध्यक्षा स्वरूपा सुर्वे,तालुका सचिव रुपाली मुरकुटे ,उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, कल्पेश कोळी उपाध्यक्ष उलवे शहर, मनोज कोळी सचिव उलवे शहर,प्रथमेश सोमण तसेच मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.नवीन कार्यालयांचे उदघाटन झाल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

Popular posts
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल, १०० % ऐवजी केवळ ५१% सभासदांच्या संमतीने करता येणार इमारतींचा पुनर्बांधणी
Image
पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
Image
८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
Image