भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?

नवी मुंबई (योगेश महाजन) :- स्वछ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत झालेल्या कामातील घोटाळा, रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात घोटाळा, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, फेरीवाले यासह ईतर कामांवर विभाग अधिकाऱ्यांसह ईतर अधिकारी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचा वचक नसल्याचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत झाली असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.पालिकेला लागलेला हा भ्रष्टाचाराचा कलंक मनपा आयुक्त राजेश नार्वेकर कसा पुसून काढणार आता हे त्यांच्यासमोर एक आव्हान आहे.तर मुंबई मनपा कोविड घोटाळाच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई मधील होणाऱ्या घोटाळ्यांची चौकशी करणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

                टी.बी.आर हा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांच्या अखत्यारीत करोडो रुपयांचे घोटाळे होत असून त्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.मनपा आयुक्त राजेश नार्वेकर हे त्यांचे आर्थिक पार्टनर असल्यासारखे ते वागत असल्याने कोणाकडे ही जा, कुठेही जा, तक्रार करा, आम्ही कोणाला घाबरत नाही अश्या अविर्भावात असल्याचे ते सध्या स्थितीत दिसून येत आहे.पत्रकार योगेश महाजन यांनी त्यांची काही विषयांवर भेट घेतली असता त्यांनी घोटाळ्यांवर माहिती देण्यास नकार दिला.यावरून त्यांच्यावर कोणाचेही वचक नसल्याचे दिसून आले.आम्ही ठरवू तेच धोरण, व कंत्राटदार बांधतील तेच तोरण या प्रमाणे सध्या त्यांचा कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांच्या अखत्यारीत झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याचे मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांना पुरावे सादर होऊनही ते कारवाई करणार कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे - बेलापूर रोड च्या देखभाल दुरुस्तीचे ११ करोड रुपयांहून अधिक रकमेचे काम सोनावणे यांच्या खास मर्जीतील पात्र नसतांनाही त्या कंत्राट दाराला देण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत.यातील भली मोठी रक्कम सोनावणे यांच्या पदरात पडणार असल्याने एकाच कंत्राटदाराला तब्बल ११ करोड रुपयांहून अधिक रकमेचे काम देण्याचा घाट घालण्यात येत असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात सुरु आहे.नेरुळ शिरवणे मध्येही पाण्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले असून त्यातील हि करोडो रुपयांचा मलिदा अधिकाऱ्यांच्या घशात जाणार असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात आहे.विभाग कार्यालय स्तरावरही विभाग अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी स्वतःची पोळी भाजून घेण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.भाजप नेते तथा ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी तर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समोर अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाचा पाढाच वाचला.कोणते टेंडर कधी निघणार यांची माहिती जर प्रशासनाचा कर्मचारी देत असेल तर इतरांनी करायचं काय असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला.पाच लाख रुपये दे नाहीतर बांधकाम तोडतो असे जाहीरपणे बोलणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा थेट प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला तर राज्याचे माजी महापौर जयवंत सुतार यांनीही नेरुळ विभागातील त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून अधिकारी स्वतःच स्वार्थ साधण्यात मग्न असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वेळीच जर अधिकाऱ्यांवर जरब बसवला नाही तर भविष्यात अधिकारी स्वार्थासाठी ऐकेकांबरोबर भांडतांना दिसून येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाशी विभागात अनधिकृत बांधकामे, मार्जिनल स्पेस वरील अतिक्रमणे तर मोकळ्या जागेवर झालेले अवैध व्यवसाय हे नित्यनियमाचे झाले असून यावर वाशी विभाग कार्यालयाचा कोणताही अंकुश नाही.यावर कारवाई व्हावी म्हणून समाजसेवक योगेश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी लेखी अर्ज दिला असता त्यावर कारवाई करण्याऐवजी फक्त कारणं सांगून वेळ मारून नेण्यात आले.या विषयी विभाग अधिकारी सोडगे यांची भेट घेतली असता तुमच्या अर्जावर तत्काळ कारवाया करण्यात येतील असे त्यांनी अतिक्रमण अधिकारी अभय गावित यांच्यासमोर आश्वासन दिले.त्यानंतर गावित यांच्याशी कारवाया संदर्भात वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून फक्त वेळ मारून नेण्यात आली तर कारवाईचे आजतायागत आश्वासने देण्यात आली.त्याही पुढे जात त्यांनी ऑफरचं दिल्याने मनपाचे अधिकारी प्रशासनसाठी काम करतात की भूमाफिया यांच्यासाठी असा प्रश्न उपस्थित झाला.असे जर अधिकारी काम करत असतील तर इतर इमारतींवर का कारवाई केली जाते असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रार अर्ज विभाग कार्यालयात प्रलंबित असून अधिकारी अर्जाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेतात की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वाशी रेल्वे स्थानक समोर असलेल्या रघुलीला मॉलच्या जवळील मोकळी जागा ते  वाशी गावात जाणाऱ्या रस्त्या पर्यंत असलेल्या मोकळ्या जागेवर चायनीज धाबे, भंगार वाले, झोपडपट्टी धारक यांनी बस्तान मांडले आहे.याचीही कल्पना वारंवार देऊनही त्यांच्यावर नाममात्र कारवाई करण्यात येत आहे. वाशी विभाग कार्यालयातील  अतिक्रमण अधिकारी अभय गावित हे अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी कार्यरत असून त्यांचे वाशी विभाग कार्यालय हद्दीतील अनधिकृत बांधकाम, मार्जिनल स्पेस, मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्याशी आर्थिक साटेलोटे आहे की काय ?, अश्या या स्वार्थी अधिकाऱ्यांच्या कार्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असतो.नेरुळ मध्ये काही वर्षांपूर्वी कृष्णा कॉम्प्लेक्स व त्रिमूर्ती पार्क इमारतीचे काम बेकायदेशीर रित्या सुरु असतांना त्याकडे विभाग अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला.नंतर त्याच इमारतींना नोटीस गेली असता तेथील शेकडो नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली.त्यात त्यांना अपयश आल्याने तब्बल १० वर्षांनी आता या ठिकाणी दोन्ही इमारतींवर हातोडा पडणार आहे.वेळीच जर त्यावर कारवाई झाली असती तर आजमितीस शेकडो कुटुंब बेघर झाले नसते.याचे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर असतांनाही पैशासाठी अधिकारी आजही लाचार झालेले दिसून येत आहे.नेरुळ विभाग कार्यालय हद्दीतही अनेक अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु असून विभाग कार्यालय मात्र सुस्त आहे.या इमारतीमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बांधकाम व्यावसायिक आम्ही सर्व मॅनेज केले आहे, घाबरू नका, असे बिनधास्त सांगून घरे विकत असल्याने भविष्यात त्यांना अनेक अडचणी येतात.आजमितीस नेरुळ विभातील गावठाणमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.त्यांच्यावर आजच अंकुश लावला नाही तर भविष्यात त्याचा फटका हजारो जणांना बसू शकतो.नवी मुंबईतील असा एकही भाग नाही की त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, मार्जिनल स्पेस, मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले नाहीत.हफ्तेखोरीच्या लागवडीमुळे अनधिकृत बांधकाम, मार्जिनल स्पेस, मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाल्याना खतपाणी मिळत असल्याने ही किडचं मोडून काढावी लागेल असे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे.बहुतांश विभाग कार्यालयात अनेक वर्षांपासून अतिक्रमण खात्यावर तेच तेच अधिकारी कार्यरत असल्याने कुठे काम सुरु आहे, कुठून मलिदा मिळेल याची माहिती त्यांना असते.त्यामुळे मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागवार माहिती घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या जागी नवीन अधिकारी आणण्याची गरज असल्याचे महाजन यांनी व्यक्त केले आहे.तर आजतायागत विभागवार किती तक्रार अर्ज आले,त्या अर्जावर किती कारवाया झाल्या याचाही आढावा आयुक्तांनी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळात एकूण १५ निर्णय घेण्यात आले., ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प , पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प , बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद 3 ऑक्टोबर रोजी
Image