८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.

८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक 

महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.

उरण - महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या ठाणे,मुलुंड,भांडुप, नवी मुंबई,बेलापूर,पनवेल,तळोजा व उरण या भागामध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मे.आदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खाजगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे.अदानी इलेक्ट्रिकल कंपणीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे,कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला कायम करावे,तिन्ही वीज कंपन्यातील ४२००० रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी,दि.१.४.२०१९ नंतर कार्यान्वित केलेले उपकेंद्र ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्याची पद्धत बंद करावी,इंनपॅनमेंट द्वारे काम करण्याची पद्धत बंद करावी, महानिर्मिती कंपनीतील जलविद्युत केंद्र खाजगी भांडवलदारांना देण्यात येऊ नये, महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगी भांडवलदारांना देऊ नये यास विरोध करण्याकरीता ४ जानेवारी २०२३ रोजी निर्मिती,पारेषण,वितरण कंपन्यातील वीज कामगार, अभियंते,अधिकारी,कंत्राटी कामगार विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,वीज ग्राहकांच्या संघटना यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संपाची हाक दिली आहे.

                  जानेवारी २०२३ पासून राज्यातील ८६००० कामगार,अभियंते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक ७२ तासाच्या बेमुदत संपावर जाणार आहेत . सरकारने यानंतरही वीज कंपन्यांचे खाजगीकरणाचे धोरण थांबविले नाही तर १८ जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.संघर्ष समितीचे राज्यातील जनतेला आव्हान आहे की, वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाही तर राज्यातील जनतेच्या मालकीचा हा वीज उद्योग टिकला पाहिजे. तो खाजगी भांडवलदारांना विकता कामा नये.कारण खाजगी भांडवलदार फक्त नफा कमविण्याच्या उद्देशाने येत आहे. खाजगी भांडवलदार शेतकरी व दारिद्र्यरेषे खालील, पावरलूम धारक,१०० युनिटच्या खाली वीज वापरणारे ग्राहक,दिवाबत्ती,पाणीपुरवठा यांना सबसिडीच्या दराने मिळणारी वीज बंद होईल.क्रॉस सबसिडी पूर्णपणे बंद होईल,आदिवासी दुर्गम भागातील वीज ग्राहकांना वीज मिळणार नाही,खाजगी भांडवलदार हे नफा कमवण्याच्या उद्देशाने येत असल्यामुळे ते फक्त नफ्याचे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतील व तोट्यात असलेले क्षेत्र महावितरण कंपनीकडे राहील त्यामुळे महावितरण कंपनीचा दिवसेंदिवस घाटा वाढत जाईल.राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी पूर्णपणे बंद होईल.

महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या भांडुप झोन मधील उरण ठाणे मुलूंड तळोजा क्षेत्रातील 3 लाख वीज ग्राहकांचे क्षेत्र अदाणी कंपनीने समांतर वीज वितरण करण्याकरीता M.E.R.C कडे अर्ज सादर केलेला आहे. या शासनाचा धोरणाचा वीज उ‌द्योगातील 30 संघटनांच्या संघर्ष समितीने द्वारसभा होउन नागपुर विधानसभेवर हिवाळी अधिवेशन दरम्यान 23 डिसेंबर रोजी 35 हजार कामगाराच मोर्चा काढून व संपाची नोटीस देऊन तीव्र विरोध केलेला आहे. परंतु शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे वीज उदयोगातील कर्मचारी, अधिकारी अभियंता यांना नाईलाजास्तव संप करावा लागत आहे. वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता यांच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी आमची आग्रही भूमिका आहे.

निलेश खरात - अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (सलंग्न भारतीय मजदूर संघ )


Popular posts
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image