सन 2022-23 शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन , सन 2021-22 मधील शैक्षणिक शिष्यवृत्तीचा 20 हजार 47 विद्यार्थ्यांना लाभ

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वतीने पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विविध घटकांतील 20 हजार 47 पात्र विद्यार्थ्यांना सन 2021-22 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली असून 15 कोटी 81 लक्ष 20 हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नमुंमपा मुख्यालय शाखेत पाठविण्यात आलेली आहे व बँकेमार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरूवात झालेली आहे.

                नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विविध घटकांतील इयत्ता पहिली ते महाविदयालयीन शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी 33 कोटी 25 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना जलद मिळावा यादृष्टीने समाजविकास विभागाने कार्यवाही करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले.दोन वर्षांसाठी प्राप्त 71 हजारहून अधिक अर्जांची पडताळणी, छाननी हे काहीसे जिकरीचे काम विहित वेळेत करण्याच्या दृष्टीने समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे व इतर कर्मचा-यांच्या सहयोगाने कालबध्द आखणी केली व तिची काटेकोर अंमलबजावणी केली, त्यामुळेच सन 2021-22 ची 20 हजार 47 पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृ्त्ती वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2021-22 साठी 34,318 तसेच सन 2022-23 या वर्षासाठी 37,557 अशाप्रकारे दोन वर्षांसाठी एकूण 71,875 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या नोंदणीचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 होता. इतक्या मोठ्या संख्येने प्राप्त अर्जांतून पहिल्या टप्प्यात 31 मार्च 2023 पूर्वी सन 2021-22 ची शैक्षणिक शिष्यवृत्ती विदयार्थ्यांना विहीत मुदतीत देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले. याकरिता विभाग स्तरावर योजना प्रचार, प्रसाराचे काम करणा-या सर्व समुहसंघटक (Level-1 Verifier) यांना 1 मार्च पासून सेक्टर 11, बेलापूर भवन येथील समाजविकास विभागाच्या कार्यालयात संगणक, लॅपटॉप, नेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व प्राप्त अर्ज प़डताळणी कामाला समुहसंघटक व इतर कर्मचा-यांमार्फत जोमाने सुरूवात करण्यात आली. या सुरू असलेल्या कामावर दैनंदिन काटेकोर लक्ष ठेवण्यात आले.त्याचीच परिणिती म्हणजे केवळ 15 दिवसात जलदगतीने अर्जांची छाननी करुन सन 2021-22 या वर्षासाठी 20,047 पात्र विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात 15 कोटी 81 लाख 20 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्याकरिता या पात्र लाभार्थ्यांची यादी व रक्कमेचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया, नमुंमपा मुख्यालय शाखा यांच्याकडे देण्यात येऊन लाभ वितरण प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. सन 2021-22 चे 390 प्रलंबित अर्ज दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना परत पाठविण्यात आलेले असून या संदर्भात त्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात आलेले आहे.याशिवाय दुस-या टप्प्यातील सन 2022-23 या वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता प्राप्ता 37,557 विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आलेली असून 21,675 अर्जांची  पडताळणी पूर्ण झालेली आहे. उर्वरित 15,882 अर्जांची छाननी 23 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या उददिष्टानुसार 30 एप्रिलपर्यंत सन 2022-23 वर्षाचीही शैक्षणिक शिष्यवृत्ती पात्र विदयार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून त्यानुसार कालबध्द कार्यवाही सुरू असल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी दिली आहे. 

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image