अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा

नवी मुंबई :- ज्या अनधिकृत इमारतींवर काही दिवसांपूर्वी नेरुळ विभाग कार्यालयच्या माध्यमातून तोडकं कारवाया करण्यात आल्या होत्या त्या इमारतींचे काम पुन्हा जोमाने सुरु आहे.या सर्व कामांची माहिती नेरुळ विभाग कार्यालयाला असली तरी आजमतीस विभाग कार्यालय मूग गिळून गप्प बसलं आहे.व फक्त काम किती लवकरात लवकर होईल व त्यात नागरिक कधी राहायला येतील याचा विभाग कार्यालयात बसून आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत शेकडो जण बेघर झाले आहेत.तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.मात्र याचे कोणतेही सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत असल्याने अपना काम बनता,भाडं मे जाये जनता या म्हणीप्रमाणे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे.जो देगा उसका भला, जो नही देगा उसके उपर बुलडोजर चला या प्रमाणे कामे होत असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी शिरवणे गावातही जी + २ इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली होती,ती कारवाई सुद्धा दिखाऊ असल्याची दिसून येत आहे.थातुर मातुर कारवाई करायची नंतर मग डीलिंगला बसायचे अशी प्रथा पडतांना दिसून येत आहे.याचे गंभीर परिणाम ग्राहकांना भोगावे लागत असल्याने अजून किती घर उध्वस्त होणार आणि किती नागरिक बेघर होणार हे वेळच ठरवणार आहे.तो पर्यंत भ्रष्टाचारी अधिकारी आपले पोट भरून निघून गेले असतील मन नंतर फक्त आरोप प्रत्यारोप होतील.


Popular posts
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image