नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?

नवी मुंबई :- महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून सध्या स्थितीत अनधिकृत बांधकामांवर दिखाऊ कारवाया होत असून त्यातून अधिकारी आर्थिक हित साधत असल्याचे दिसून येत आहे.अर्धवट कारवाई करायची नंतर मोठ्या प्रमाणात सेटलमेंट करायची अशी प्रक्रिया सध्या मनपाच्या सर्वच विभाग कार्यालयात सुरु आहे.

           ९ डिसेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्राअंर्तगत असलेल्या अनधिकृत बांधकाम धारक रामचंद्र बाळाराम ठाकूर घर क्र.105, नेरूळगाव, नेरूळ या इमारतीवर निष्कासन कारवाई करण्यात आली.त्यानंतर ११ डिसेंबर रोजी पुन्हा अनिधकृत बांधकाम धारक 1) रामचंद्र बाळाराम ठाकूर घर.105, 2) इंदरा श्रीराम ढाकणे घर.0105/0002, 3) अनिधकृत बांधकाम धारक, बालाजी टेकडी जवळ, नेरूळगाव, नेरूळ येथील तीन अनधिकृत इमारतींवर निष्कासन  कारवाई करयात आलेली आहे.सदर अनधिकृत इमारतीवर निष्कासन कारवाई सिडको व नमुंमपा यांची संयुक्त कारवाई, नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग कार्यालय सहा. आयु तथा विभाग अिधकारी जयंत जावडेकर यांचे समवेत,पोलीस बंदोबतात करयात आले. या मोहीमेकरीता 18 मजुर, 7 ब्रेकर, 2 गॅस कटर वापरयात आले. सदरची कार्यवाही नेरूळ अतिक्रमण  विभागातील अधिकारी /कर्मचारी यांचे समवेत सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांच्या मार्फत करण्यात आली आहे.यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले होते.त्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा कामाला सुरवात झाल्याने नेरुळ विभाग कार्यालयाच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.सदरील कारवाई हि सेटलमेंट साठी करण्यात आली असल्याची चर्चा परिसरात असून प्रति इमारत १५ ते २० लाख रुपये घेऊन सिडको व मनपाच्या विभागाने प्रोटेक्शन दिल्याची चर्चा परिसरात आहे.बालाजी मंदिर परिसराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर बांधकाम धारकांनी दगड फोडून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांना सुरवात केली आहे.या दगड फोडीमुळे आजूबाजूला असलेलया इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून भविष्यात टेकडीवरील बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक इमारतींना तडे जाण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या बांधकामांमुळे जर भविष्यात सामान्य नागरिक अडचणीत आला अथवा जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

Popular posts
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image