नवी मुंबई :- अनधिकृत इमारतींमुळे आजतायागत शेकडो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून अजून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार असला तरी त्यांना शिक्षा होत नसल्याने आजही तेच प्रकार सुरु आहेत.सिडको हद्दीत हजारो अनधिकृत बांधकामे असून मार्च २०२५ पर्यंतची यादीच सिडकोने जाहीर केली आहे.सिडको कडून फक्त अतिक्रमण संदर्भात कागदी घोडे नाचवले जात असून त्याच धर्तीवर अधिकारी आपली आर्थिक पोळी भाजून घेण्याचे काम करतांना दिसून येत आहेत.थातुर मातुर कारवाया करून बलाढ्य भूमाफियांना अभय देण्याचे काम सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून केले जात असल्याने आजही बहुतांश ठिकाणी अनधिकृत कामे जोमाने सुरु आहेत.
रोडपाली गावातील इंद्रायणी हाऊस च्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून जी + ५ इमारतीचे बांधकाम सुरु आहे.हरी पटेल नामक बांधकाम व्यावसायिक सदरील इमारत उभारत असल्याची चर्चा या गावात असून त्याचे व सिडको अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचे खास हितसंबंध असलयाचे सांगण्यात येत आहे.सिडकोचे अनधिकृत बांधकामे नियंत्रक लक्ष्मीकांत डावरे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागात सदरील इमारत असून या व्यक्तिरिक्त ही अजूनही बांधकामे त्यांच्या हद्दीत सुरु असल्याचे दिसून आले आहे.त्याचबरोवर अतिक्रमण ही मोठ्या प्रमाणात या विभागात असल्याचे दिसून येत असून त्यावर कारवाई होतांना दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत इमारतींच्या बाबतीत तक्रारी प्राप्त असतांनाही डावरे व त्यांचे सहकारी उघड उघड दुर्लक्ष करत असल्याचे आजमितीस अनधिकृत बांधकामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी डावरे यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.डावरे व अनेक भूमाफिया यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.याला भविष्यात अनेक नागरिक बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.बेलापूर गावातही जी + ६ मजली अनधिकृत इमारत ही पूर्णत्वास आल्याची दिसून येत आहे.बेलापूर गाव सेक्टर २० मध्ये घर नंबर - ००६१ - ००५ बाबा हाऊस ही जी + ६ मजली अनधिकृत इमारत कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली याची चाचपणी झाल्यास यातून अनेक भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची नावे समोर येतील.सदरील इमारत ही १२ % टक्के योजनेतील भूखंडावर उभीं असल्याचे सांगण्यात येत असून सिडको व महापालिका अतिक्रमण विभागाने याची चौकशी करणे गरजचे असल्याचे सांगण्यात येत आहे.भविष्यात जर एखादा नागरिक न्यायालयात गेल्यास या इमारतीमधील अनेकांना आपली घरे रिकामी करावी लागतील.याचबरोबर अजूनही अनधिकृत इमारतींचे बांधकामे बेलापूर गावात सुरु असून महापालिका व सिडको चा अतिक्रमण विभाग करतो काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सिडकोचे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्यावर परिणामकारक नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक वसाहत अधिकारी यांच्यावर प्रत्येक नोडमधील प्रभाग अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून ऑगस्ट १९९९ पासून हे सुर्वेक्षण, शोध व बांधकाम निष्कासित करणे याकामात सहभागी होत आले आहेत. अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्याबाबतचा अहवाल नियंत्रक अनधिकृत बांधकामे यांना सादर केला जातो. त्यानंतर सर्व्हेयर व ड्राफ्टस्मन त्या स्थळी जाउन स्थळ, सर्वे क्रमांक, भूखंड क्रमांक, अनधिकृत बांधकामाचे मोजमाप व त्याचा वापर यांचा प्रत्यक्षदर्शी तपशील गोळा करतात. या तपशीलाबरहुकूम सहाय्यक नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभाग क्रमांक ५३, ५३ व ५५ एमआर अँड टीपी अधिनियम अन्वये अनधिकृत बांधकामांशी संबधित व्यक्तींना नोटीस बजावतात. कायद्याच्या तरतुदीनुसार १५ ते ३२ दिवसांच्या अवधीत सदर नोटिशीच्या प्रत्युत्तरादाखल संबधित व्यक्तीने कृती न केल्यास अनधिकृत बांधकामांच्या यादीत त्या बांधकामाचा समावेश केला जातो.