२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.
आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांचा प्रश्न पुन्हा एकदा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सरकार ही गावं वगळण्याच्या सकारात्मक भूमिकेत आहे असे सांगितले.
#कल्याणडोंबिवलीमहानगरपालिका #गावं२७ #ThaneLive