पनवेल तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये डीएड व बीएड पदवीधर व पात्रता असलेले शिक्षक आहेत का याची तपासणी करा ! राजे प्रतिष्ठानचे गटशिक्षणाधिकरी यांना लेखी पत्र

*पनवेल तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये डीएड व बीएड पदवीधर व पात्रता असलेले शिक्षक आहेत का याची तपासणी करा ! राजे प्रतिष्ठानचे गटशिक्षणाधिकरी यांना लेखी पत्र.*                                                           पनवेल / प्रतिनिधी : आजच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य असून आपला पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकायला पाहिजे असे अनेक पालकांचे मत आहे. मात्र आमच्या माहितीनुसार पनवेल तालुक्यातील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आकुर्ली, सुकापूर, तळोजे व अन्य शहरे व गावा ठीकाणी इंग्रजी माध्यम येथे विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेले शिक्षक हे १० वि व १२ वि पास आहे नियमानुसार या इंग्रजी शाळांमध्ये शिकविण्यासाठी असलेला शिक्षक डीएड व बीएड पात्रता असलेला असावा मात्र कमी पगारामध्ये १० वि १२ वि पास झालेले शिक्षक सहज उपलब्ध होत असल्याने शाळा प्रशासन देखील असेच शिक्षक ठेवणे पसंत करते मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा खालावला जात असून पुढचे भविष्य हे अंधारात असल्याचे दिसून येते तरी अशा प्रकारे नियम डावलून काम करणाऱ्या शिक्षण संस्था व शाळेवर कारवाई करावी अन्यथा आम्ही अशा शिक्षकांची यादी सन्माननिय न्यायालयात प्रसिद्ध करून संबंधित शाळेवर व प्रशासनावर न्यायालयीन कारवाई करू तरी आपण या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी तसेच गटशिक्षण अधिकारी या नात्याने प्रत्येक शाळेस भेट देऊन शाळा तपासणी करून जो अहवाल बनवला आहे तो शिक्षणासहित सादर करावा व पनवेल तालुक्यामध्ये एकूण मान्यताप्राप्त खाजगी शाळा किती व कोणत्या ? 
स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड व आयबी बोर्डच्या शाळा किती व कोणत्या ? 
प्रत्येक शाळेवरील शिक्षकांची यादी व नियुक्ती दिनांक ? 
आरटिइ अधिकार कोणत्या शाळांना लागू आहे व कोणत्या नाही ? नसल्यास त्या संस्थेची माहीती व कारणे द्यावी अशी मागणी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनि गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.


Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image