नेरुळ येथे मनुष्य मिलन साधना शिबिराची सांगता....
" योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान " या सूत्राच्या माध्यमातून प्रत्येक मानवाचे शरीर व मन सुदृढ होते याची प्रचिती प्रयोगाच्या माध्यमातून -अनुभवातून देणाऱ्या 'मनुष्य मिलन साधना शिबिराचे ' आयोजन २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत नेरुळ येथील रामलीला मैदानात आयोजीत केले होते . या शिबिराचा लाभ जवळपास ३ हजार नागरीकांनी घेतला . सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६. ३० ते ८.३० या दोन सत्रात परमपूज्य श्री . परम आलय जी यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून या शिबिराचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान या गोष्टींचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले . मानवाची ८० टक्के शक्ती हि डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडत असते म्हणून प्रत्येकाने आपले मन निरोगी राहण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे , आपल्या घराच्या स्वयंपाक घरात असणाऱ्या वस्तू मधूनच शरीरास आवश्यक व पोषक असे भोजन बनवले जाऊ शकते ,प्रत्येक मनुष्याच्या शरीरात अथांग शक्ती असते ती योग्य आहार व व्यायामातुन वृद्धिगत करता येते या सर्व सूत्रांचा अनुभव अनेकांना आल्याचा अनुभव या शिबिरात भाग घेतलेल्या नागरीकांनी सांगितले .
अगदी १०/१२ वर्षाच्या मुलापासून ते ७५-८० वयापर्यतच्या जेष्ठ नागरीकांनी या १० दिवशीय शिबिराचा लाभ घेतला . विशेष म्हणजे हे संपूर्ण शिबीर हे निशुल्क होते व त्याच बरोबर सर्व शिबिरार्थींना सकाळी आयुर्वदानुसार अतिशय पौष्टिक असा नाष्टा व सायंकाळी विविध प्रकारचे ७ लिक्विड्स दिले जात होते . मानवाची सूर्यनाडी व चंद्रनाडी जागृत करणारे वेगवेगळे व्यायाम शिकवले गेले . एकुणातच आपण आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नसलो तरी आपण आपला दृष्टिकॊन सकारात्मक ठेऊन आपले जीवन अधिकाधिक आनंदी व समाधानी ठेऊ शकतो व तीच आज मनुष्याची सर्वात मोठी गरज असल्याचे परम आलय गुरुजींनी सांगितले . दहा दिवसांचे हे शिबीर अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन बद्ध असल्याचे त्यात प्रवेश करताना शिबिरासाठी आलेल्या साधकांनी अतिशय शिस्तीत सोडलेल्या पादतत्राणा तुन दिसत होते . १० व्या दिवशी शिबिराची सांगता करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद या शिबिराच्या यशस्वतीतेची साक्ष देत होते .
पुन्हा नवी मुंबईत २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२० मध्ये शिबिरार्थींच्या खास आग्रहातून करत असल्याचे आयोजकांनी सांगितले .
शब्दांकन : सुधीर दाणी . ( शक्य असल्यास बातमी देणे )