जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी वाटप करून करणार सन्मानित.

*जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी वाटप करून करणार सन्मानित.* 
पनवेल / प्रतिनिधी : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. यावेळी देखील ८ मार्च २०२० रोजी छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान या संस्थेकडून संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, कार्याध्यक्ष नितीन शिंदे, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी व राजू मरे तसेच मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी व मुंबई संघटक चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेलमधील कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनानेनुसार साडी व गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिनी भलेमोठे कार्यक्रम लाखो रुपये खर्च करून होतात यामध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, न्याय, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील सर्वच महिलांचा सत्कार होत असतो मात्र कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या), भंगार व्यवसाय करणाऱ्या, धुणी भांडी व घरकाम करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान फार कमी होत असतो त्यामुळे आम्ही यावर्षी अशा महिलांचा सत्कार करून त्यांचे देखील समाजात मानाचे स्थान आहे हे निदर्शनास आणून देणार असल्याचे मत रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी व्यक्त केले. दरम्यान केवल महाडिक यांच्या या कार्यक्रमाचे महिलावर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे.


Popular posts
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image