सीमेवर कर्तव्य बजावून आलेल्या सैनिकाचा कोरोना युद्धातही पुढाकार,रोज शेकडो नागरिकांना दोन्ही वेळ जेवण 


नवी मुंबई - सीमेवर कर्तव्य बजावून आलेले सेवानिवृत्त सैनिक सुरेश काकडे यांनी आता कोरोना युद्धातही पुढाकार घेतला आहे.कोरोना आजाराने भारतसह इतर देशांचे कंबरडे मोडले असून प्रत्येक देशात जैविक युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.या युद्धात अनेक जण सामान्य जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरले असतांना नेरुळ मधील माजी सैनिक व सेक्युर सर्व्हिसेस कंपनीचे मालक सुरेश काकडे यांनीही आता पुढाकार घेतला आहे.त्यांनी १७ एप्रिल पासून गरजवंत नागरिकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली असून दुपारी व सायंकाळी असे दोन वेळ ३ मे पर्यंत जेवण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेक गोर गरीब नागरिकांना दिलासा मिळाला असून येत्या ३ मे पर्यंत तरी शेकडो नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे.
                 कोरोना युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा देणारे व्यापारी हे एक योद्धा समजले जात असून आता त्यांच्याच साथीला माजी सैनिकही युद्धात सहभागी झाले आहेत.अन्यधान्य देण्यापेक्षा जेवणच दिले तर गोरगरीब नागरिकांचा प्रश्नच मिटेल या भावनेतून करावे गाव,नेरुळ गाव, जिमखाना समोरील नागरिक तसेच नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील नागरिकांना १७ एप्रिल पासून जेवण देण्याचा निर्णय देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काकडे यांनी सांगितले.यात युद्धात त्यांचा सर्व परिवार त्याचबरोबर कंपनीचे कर्मचारीही सहभागी झाले असल्याने एक प्रकारचे हे मिशनच राबवले जात असल्याचे दिसून येत आहे.दुपारी १२. ३० च्या सुमारास तर सायंकाळी ७ च्या सुमारास वरील ठिकाणी जेवण वाटप करण्यात येत आहे.या वेळेवर नागरिक शासकीय नियमांचे पालन करत अगोदरच रांग लावत असल्याने काकडे यांनाही जेवण देणे सोपे जात आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने सामान्य नागरिक सध्या स्थितीत मोठ्या संकटात अडकला आहे.यात रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर तर उपासमारीचीच वेळ आली आहे.अश्यात फक्त आपण मदतीचा हात पुढे करू शकतो अशी भावनाही काकडे यांनी व्यक्त केली आहे.


 


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image