नेरुळ पोलिसांकडून तक्रारदारांना गाजर 


नवी मुंबई :- नेरुळ मधील भाजी विक्रेते हे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी नेरुळ मधील एका नागरिकाने मंगळवारी सकाळी नेरुळ पोलिसांकडे केली असता त्या नागरिकाला पोलिसांकडून फक्त आश्वासनांची गाजरे मिळाली.प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने फेरीवाले काही वेळातच सर्व नियमांचा भंग करून तेथून निघून गेली.त्यामुळे त्या नागरिकाला टांगा पलटी,घोडे फरार या म्हणीची आठवण झाल्याची माहिती त्याने दिली.सध्या नेरुळ विभागातील फेरीवाल्यांवर कोणाचेही वचक नसल्याने सर्वत्र फेरीवाले फोफावले आहेत.यातच जर कोरोनाचा प्रभाव वाढला तर त्याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
                भाजी व फळ मार्केट मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.असे असतांनाही मात्र या व्यवसायिकांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाहीये.नेरुळ सेक्टर सहा मधील सारसोळे डेपो समोर असलेल्या भाजी विक्रेत्याने तर त्या ठिकाणी मिनी होलसेल मार्केटच उभारले आहे.या ठिकाणी सकाळी ६ च्या सुमारास गर्दी करत अनेक भाजी व फळ विक्रेते भाजी माल घेण्यासाठी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवत एकत्र येतात तर काही जणांच्या तोंडाला माक्सही नसते.त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो यामुळे अश्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी तेथील एका स्थानिक नागरिकाने मंगळवारी सकाळी ६.०६ वाजता नेरुळ पोलीस ठाण्यात फोन केला त्यावेळी त्याला पोलिसांकडून काही वेळातच पोलीस पाठवतो असे सांगण्यात आले.त्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीने ६.१६ वाजता फोन केला.तेव्हाही पाच मिनटात पोलीस येथील असे सांगण्यात आले.त्यावर कोणीही न आल्याने पुन्हा ६.३५ वाजता फोन करण्यात आला त्यावेळी दोन मिनटात येतो असे सांगण्यात आले.त्यानंतर कोणीच न आल्याने काही वेळाने सर्व विक्रेते त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र नेरुळ पोलीस ठाण्याहून साधे कोणी त्या ठिकाणीही फिरकले नाही.कायद्याचा वचक नसल्याने नेरुळ मधील भाजी व फळ विक्रेते बेफिकीर झाल्याने नेरुळकरांची चिंता वाढली आहे.बेलापूर नंतर नेरुळ मध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत.वेळीच जर प्रशासनाने सावधगिरी बाळगली नाही तर नवी मुंबईतील नेरुळ विभागात सर्वाधिक रुग्ण वाढू शकतात अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image