आधुनिक बूम स्प्रेयर वाहनाव्दारे कोरोना हॉटस्पॉट्सचे प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण

आधुनिक बूम स्प्रेयर वाहनाव्दारे कोरोना हॉटस्पॉट्सचे प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण


नवी मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये  आरोग्य आणि स्वच्छता या परस्पर पुरक बाबी असल्याचे लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाईकडे विशेष लक्ष देत तसेच क्वारंटाईन केंद्रे व घरे याठिकाणचा बायोमेडीकल कचरा स्वतंत्रपणे सुरक्षितरित्या संकलित करण्याकडे काळजीपुर्वक लक्ष देण्यात येत आहे.या सोबतच वर्दळीच्या ठिकाणांवर अत्याधुनिक जेटींग मशीनव्दारे सोडियम हायपोक्लोराईड सारखे जंतुनाशक फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे तसेच गावगावठाण व झोपडपट्टी भागातही खांद्यावर अडकविण्याच्या मशिनव्दारे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.


                   यामध्ये आता स्वाध्याय परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागास देण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा 5 अत्याधुनिक बूम स्प्रेयर शक्तीमान वाहनांमधील 1 वाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात फवारणी करण्यासाठी देण्यात आले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो अशा परिसरात तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येते. त्याठिकाणी तसेच इतर हॉटस्पॉटवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी या अत्याधुनिक वाहनाचा उपयोग होणार आहे.या अत्याधुनिक वाहनाव्दारे एकाच वेळी 23 फुट रुंदीच्या पट्ट्याचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असून वाहनाच्या पुढील भागात असणारे ॲडजेस्टेबल हॅन्ड्स ॲटोमॅटीक दुमडले जाऊन छोटे रस्ते व गल्ल्यांमध्येही या वाहनाच्या माध्यमातून फवारणी केली जाऊ शकते. 600 लिटर सोडियम हायपोक्लोराईड हे जंतुनाशक साठवण क्षमता असून या संपूर्ण यंत्रणेची व फवारणी पध्दतीची पाहणी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिका-यांसमवेत केली.स्वाध्याय परिवाराच्या दिदी धनश्री तळवलकर यांनी ही ट्रॅक्टर स्वरुपातील 5 अत्याधुनिक बूम स्प्रेयर शक्तीमान वाहने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला दिलेली असून या आधुनिक वाहनामुळे कमी कालावधीत व मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुलभ होत आहे.


Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image