नवी मुंबई - लॉकडाऊन च्या काळात बंद असलेल्या दुकानांचे शर्टर तोडून त्यातील लाखांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
महेंद्र अविनाश पाटील (२४) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.तो कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये राहणार असून त्याच्याकडून ८१ हजार रुपयांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.तो ज्या साथीदारांच्या सहाय्याने चोरी करायचा त्यांचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे.गेल्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळात कोपरखैरणेत वॆद्यकीय दुकानात ,रबाळेत वैद्यकीय व दोन किराणा दुकानाचे शर्टर तोडून महेंद्रने दुकानातील नऊ लाखांचा ऐवज चोरून नेला होता.या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध सुरु केला.त्याचेवेळी तो कोपरखैरणेत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी त्याला त्याच्या घरातून अटक करून त्याची चौकशी केली त्यावेळी त्याने केलेल्या गुह्याची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या रकमेमधून ८१ हजार रुपये रोख रकम हस्तगत केली आहे.त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.त्याच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.
लॉकडाऊन दरम्यान घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक