ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कामगार, व्यापारी, कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष

ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कामगार, व्यापारी, कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष


नवी मुंबई  - 'कोव्हीड 19' चा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने गर्दी होऊ न देणे हाच त्यावर प्रभावी उपाय आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सूचित केल्याप्रमाणे ए.पी.एम.सी.मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैदयकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला.


                  पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 12 तासाच्या आत त्वरीत ए.पी.एम.सी. प्रशासनाशी चर्चा करीत 5 मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहेत व फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट या तीन ठिकाणी तपासणी कामही सुरु केले. या तिन्ही ठिकाणी पहिल्या दिवशी 500 हून अधिक जणांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली असून याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात आहे.प्रत्येक कक्षात डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात आली असून ते कक्षात येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनीग करीत आहेत तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेऊन त्यांना ताप, घशात खव-खव / खोकला, सर्दी, श्वसनास त्रास अशाप्रकारची लक्षणे आहेत काय याची विचारपूस करून त्यादृष्टीने तपासणी करीत आहेत व आजाराची तीव्रता बघून औषधोपचार सूचवित आहेत. या तपासणीमध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅनव्दारे थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.नवी मुंबईतील ए.पी.एम.सी. मार्केट ही आशियातील अत्यंत मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ असून त्याठिकाणी वाहनांची व माणसांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना घेत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याठिकाणी कोरोना नियंत्रक विशेष वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.भाजीपाला मार्केट येथील आवक-जावक सकाळी लवकर असल्याने येथील तपासणी कक्ष सकाळी 7 ते 11 यावेळेत कार्यरत असेल तसेच फळ मार्केट व दाणा मार्केट मधील तपासणी कक्ष सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत कार्यरत असणार आहे. मसाला मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट मधील कक्षही सुरू करण्यात येत आहेत. तरी ए.पी.एम.सी. मार्केट संबंधित सर्व घटकांनी या तपासणी कक्षाला भेट देऊन आपली आरोग्य विषयक तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. 


Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image