भाजपा नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश

भाजपा नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश


नवी मुंबई - कोरोनाच्या ग्रहणातून देश जात असताना राज्य आणि केंद्र शासनाने घातलेले निर्बंध तुडवून वाढदिवसाची जंगी पार्टी आयोजित केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांच्याविरुद्ध राज्य शासनाचे नियम, ध्येय धोरणानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूलचे उपायुक्त तथा  कोकण विभागाच्या मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहेत.
               पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांच्या गैरकृत्याचा पर्दाफाश करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग २० चे भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांचा १० एप्रिलला वाढदिवस होतो. देशात लॉकडाउन आणि संचारबंदीचे कडक आदेश आणि अंमलबजावणी सुरू असताना बहिरा यांनी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर जंगी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते.शहर पोलिसांनी छापा टाकून बहिरा आणि अन्य दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. बहिरा यांनी लोकप्रतिनिधीच्या कर्तव्यात कसूर करून सभ्येतेचे धिंडवडे काढले आहेत. त्यांनी केलेले अशोभनिय आणि गैरवर्तनामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांना महापालिका अधिनियमा प्रमाणे अपात्र ठरवावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली होती.कोकण विभागाच्या मुख्यमंत्री सचिवलयाने कडू यांच्या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश देत त्याचा अहवाल मुख्यमंत्री कोकण विभागीय कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बहिरा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image