पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी 25 मे ची डेडलाईन


नवी मुंबई - सध्या कोरोनामुळे आरोग्यविषयक आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जात असताना आगमी पावसाळी कालावधीच्या दृष्टीनेही सतर्क राहण्याची गरज असून महानगरपालिकेसह सर्व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामे 25 मे पर्यंत पूर्ण करावीत व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारे कामांचे नियोजन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत.पावसाळापूर्व नियोजनाबाबत शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेतली व संबंधित विविध प्राधिकरणांच्या अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात आयुक्तांसमवेत उपस्थित अधिकारी देखील सोशल डिस्टन्सींगचे पालन करून स्थानापन्न झाले होते. या बैठकीत त्यांनी पावसाळीपूर्व गटारे सफाई, नालेसफाई यांची सुरु असलेली कामे कोरोनाविषयीची आचारसंहिता पाळून तत्परतेने करावीत असे निर्देश देतानाच आवश्यकता भासल्यास सफाई कामगारांची व्यवस्था सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून एखादे समाजमंदिर वा शाळेत करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.


                         अतिक्रमण विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे विभाग कार्यालयांच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून त्याची सूची प्रसिध्द करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी विभागाने सध्या सुरु असलेली स्थापत्य कामे कोव्हीड - 19 ची आचारसंहिता पालन करून पावसाळ्यापूर्वी तातडीने करून घ्यावीत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आत्ताच आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी सूचित केले. उद्यान विभागामार्फत करण्यात येणारी झाडांची छाटणीही विहित वेळेत पूर्ण करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे बांधकामे तसेच इमारत दुरूस्ती / नुतनीकरण कामे थांबलेली आहेत, त्यामधील पावसाळीपूर्व आवश्यक कामे करण्याकरिता कोव्हीड -19 च्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन याबाबतच्या परवानगीसाठी महापालिका स्तरावर एक समिती गठित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली, सहा. संचालक नगररचना आणि नगररचनाकार असे सदस्य असणारी ही समिती बांधकाम / दुरूस्तीबाबत ऑनलाईन प्राप्त होणा-या निवेदनांवर कोव्हीड 19 च्या आचारसंहितेच्या व लॉकडाऊनच्या नियमांचा विचार करून महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने निर्णय घेईल व तो संबंधितांना कळविण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.कोव्हीड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध आणण्यासाठी उपाययोजना करताना आरोग्य विभागाने आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन त्याचे पूर्वनियोजन करावे असे स्पष्ट करीत त्यादृष्टीने तातडीने पावले उचलावीत असे आयुक्तांनी निर्देशित केले.या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांसह सहभागी असलेल्या पोलीस, वाहतुक पोलीस, एमएसईडीसी, एपीएमसी या शासकीय प्राधिकरणांसह टीबीआयए, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो., नागरी संरक्षण दल, मच्छिमार संघटना यांचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी सविस्तर चर्चा केली व झालेल्या कामांचा आढवा घेतला. तसेच इतर संबंधित प्राधिकरण / संस्थांना याबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांना आयुक्तांनी दिले.कोरोनाशी लढताना त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन पावसाळापूर्व कामांकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व संबंधित विभागांनी व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामे 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.


 


Popular posts
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image