वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील दहावा कोविड-१९ रुग्ण यशस्वी उपचारानंतर स्वगृही रवाना

वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील दहावा कोविड-१९ रुग्ण यशस्वी उपचारानंतर स्वगृही रवाना


नवी मुंबई - फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटल येथून कोविड-१९ चा दहावा रुग्ण यशस्वी उपचारांनंतर आज घरी परतला आहे .परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला कोरडा खोकला आणि घशाजवळ सौम्यशी जळजळ आणि घरघर अशा लक्षणांसाठी २८ एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.यापूर्वी याच रुग्णालयातून कोविड-१९ च्या नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, या सा-यांवर हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये लक्षणांबरहुकुम उपचार करण्यात आले होते. अत्यंत बारकाईने केलेल्या नियोजनातून मुख्य हॉस्पिटलपासून अलग अशी ही खास कोविड-१९ विंग उभारण्यात आली असता रुग्णांच्या देखभालीसाठी घरांपासून दूर राहणारे आरोग्यकर्मी आणि बिगर-वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी याठिकाणी घेण्यात आली आहे.
                हॉस्पिटलचा दुसरा कोविड-१९ असलेल्या ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला मोठ्या प्रमाणात धाप लागणे आणि खोकला या लक्षणांसाठी उपचार देण्यात आले. या रुग्णाला अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाचा आजारही होता.कोणताही परदेश प्रवास न केलेली ४४ वर्षीय स्त्री रुग्ण हॉस्पिटलची तिसरी रुग्ण होती व सततच्या कोरड्या खोकल्याची तक्रार असल्याने तिला येथे दाखल करण्यात आले होते.हॉस्पिटलची चौथी रुग्ण ही परदेश प्रवासाचा कोणतीही पार्श्वभूमी नसलेली एक ५२ वर्षीय महिला होती. सततचा ताप आणि त्याचबरोबर पॅन्क्रियाच्या कर्करोगाचा पूर्वेतिहासही असलेल्या या रुग्णावर हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये उपचार करण्यात आले आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.पाचवा रुग्ण, कोणताही परदेश प्रवास न केलेला ३० वर्षीय पुरुष होता. या रुग्णामध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती व इतर एका कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील माणसांच्या तपासणीतून या रुग्णाला विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते.सहावा रुग्ण असलेल्या ४८ वर्षीय पुरुषावर लक्षणांनुसार उपचार करण्यात आले. हा रुग्ण ताप, प्रचंड अंगदुखी आणि अशक्तपणाची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.कोणतीही लक्षणे न आढळलेल्या आणखी दोन रुग्णांमध्ये एक ३५ वर्षीय स्त्री रुग्ण व एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश होता. हे दोन्ही रुग्ण डायलिसिसवरही होते व त्यांच्या प्रकृतीच्या या अन्य तक्रारी लक्षात ठेवून त्यांना उपचार देण्यात आले.नववा रुग्ण असलेल्या एक ३५ वर्षीय महिलेसही परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. छातीत दुखणे, ताप, घसा बसणे, धाप लागणे, एकूणच अशक्तपणा आणि डोकेदुखी या लक्षणांवरून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही महिला प्री-डायबेटिकसुद्धा होती. हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले व त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.उपचारांना अधिकाधिक चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हॉस्पिटलमधील मेडिकल टीमने आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार घरच्या घरी क्वारंटाइनमध्ये राहताना घ्यावयाच्या काळजीविषयी सर्व रुग्णांचे समुपदेशन केलेआहे.गुंतागुंतीची आणि गंभीर प्रकरणे हाताळण्याविषयी इंटरनल मेडिसीन विभागाच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. फराह इंगले आणि इंटेन्सिव्ह केअर विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर टी म्हणाले,  ''आम्ही नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, इतर गंभीर आजारांची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांपासून ते सौम्यशी लक्षणे दाखविणा-यांपर्यंत खूप वेगवेगळ्या गटांत मोडणा-या रुग्णांवर उपचार करत आहोत. या आजारावरील उपचारांची संपूर्ण पद्धती समजावून घेत आमच्या टीम्स रुग्णांच्या वाढत्या संख्येशी दोन हात करण्यासाठी सुसज्ज आहे.''कोविड-१९वर यशस्वी मात करत डिस्चार्ज घेणा-या रुग्णांविषयी बोलताना फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीचे फॅसिलिटी डायरेक्टर संदीप गुदुरु म्हणाले, ''रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा काळ मोठा कष्टप्रद आहे, कारण ते एकमेकांना भेटू शकत नाहीयेत. मात्र, या कुटुंबियांनी आमच्या टीम्सवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. दहा रुग्णांवरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी रवाना करण्यात आले आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. या यशासाठी मी इथल्या वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय कर्मचा-यांचे कौतुक करतो; ही मंडळी समाजाची अधिक चांगली सेवा करता यावी म्हणून निव्वळ कर्तव्यभावनेच्या पलीकडे जात सेवा बजावत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांकडून आणि महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून मिळणारे पाठबळ यांच्या सहाय्याने प्रत्येक रुग्णावर जास्तीत-जास्त कार्यक्षमतेने उपचार करण्यावर, त्याची देखभाल करण्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित केले आहे व विषाणूविरोधातल्या या लढ्यामध्ये येणारे प्रत्येक आव्हान आम्ही पार करू असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे.


 


Popular posts
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, राज्यातील सगळ्यात समाज घटकांसाठी तरतुदी
Image