कामगार दिनी कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून नोंदवला नवी मुंबई महापालिकेचा निषेध 


नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई महापालिकेत सर्वच विभागात अत्यावश्यक सेवा कंत्राटी कामगारांमार्फत पुरवल्या जात आहेत.कोरोनाच्या युद्धातही सर्व कंत्राटी कामगार सर्व अत्यावश्यक सेवा विना तक्रार करदात्यानागरिकांना पुरवत आहेत.मात्र त्यांच्या वारंवार करण्यात येणाऱ्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक विचार करत नसल्याने कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई माहानगरपालिकेतील हजारो कामगारांनी नवी मुंबई महानगर पालिकेतील काळ्या फिती लावून नवी मुंबई महापालिकेचा निषेध नोंदवला आहे. 
                      महाराष्ट्रातील श्रीमंत महानगर पालिका असूनही कामगारांच्या बाबतीत मात्र उदासीन आहे. एका कायम कामगारावर होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त खर्च तथाकथित कंत्राटी कामगारावर करते. म्हणजेच ह्या तथाकथित कंत्राटी कामगारांना कायम केल्यास महापालिकेचा आर्थिक फायदाच होणार. फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी महानगर पालीका कंत्राटी पद्धत राबवत आहे.त्यामुळे प्रशासनाने अश्या कामगारांचा विचार करून त्यांना योग्य त्या सुविधा द्याव्यात आणि ज्यांना वेतन मिळाले नाही अश्याना तत्काळ वेतन मिळावे यासह अनेक मागण्यां कामगार गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे करत आहे.केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाने कोरोनासाठी लढणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेत कार्यरत कामगारांना ५० लाखाचा विमा जाहीर करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत सर्व कामगारांची नोंदणी करून विम्याचा लाभ देण्यात यावा. ७ एप्रिल २०२० रोजी आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व कंत्राटी कामगारांना ३०० रुपये विशेष भत्ता लागू करावा. या कालावधीत स्वताची स्वछता राखणे महत्वाचे आहे. यासाठी सर्व कामगारांच्या हजेरी शेडला पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांना हात मौजे मास्क सॅनिटायझर मिळावे.उद्यान विभागातील कामगारांना दोन महिने वेतन मिळाले नाही ते त्वरित मिळावे. आरोग्य विभागातील कामगार कोरोना रुग्णाच्या संपर्कात असताना त्यांना पी पी इ किट मिळाव्यात.विष्णुदास भावे नाट्यगृहातील कामगारांना सहा महिने वेतन मिळालेले नाही त्यांना त्वरित वेतन मिळावे.या मागण्यासाठी जागतिक कामगार दिनी नवी मुंबई महानगर पालिकेतील कामगारांनी काळ्या फिती लावून नवी मुंबई महापालिकेचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातील श्रीमंत महानगर पालिका असूनही कामगारांच्या बाबतीत मात्र उदासीन आहे. एका कायम कामगारावर होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त खर्च तथाकथित कंत्राटी कामगारावर करते. म्हणजेच ह्या तथाकथित कंत्राटी कामगारांना कायम केल्यास महापालिकेचा आर्थिक फायदाच होणार. फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी महानगर पालीका कंत्राटी पद्धत राबवत आहे.सध्या जे आस्मानी कोरोना संकट कोसळलं आहे त्या संकटात ठराविक कायम अधिकारी कार्यालयात बसवून कागदी घोडे नाचवत असले तरी स्वतच्या प्राणाची बाजी लावून रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांपैकी बहुतांश कामगार हे तथाकथित कंत्राटी आणि ठोक पगारी कामगार आहेत. ठाणे महानगर पालिकेने सर्वच कामगारांचा विचार करून  पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज कोविड १९  ह्या विमा योजनेअंतर्गत सर्वच कामगारांची ( कायम, ठोक पगारी, कंत्राटी) नोंदणी सुरू केली आहे. परंतु नवी मुंबई  महानगर पालिका कामगारांचा विमा काढण्यात पुढाकार घेत नाही हि बाब खेदाची असल्याची खंत ही कामगारांनी व्यक्त केली आहे.


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image