कोटक महिंद्रा बँक एम्प्लॉई युनियन तर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप 

कोटक महिंद्रा बँक एम्प्लॉई युनियन तर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप 
नवी मुंबई - कोरोना युद्धात सामान्य नागरिकांवर अनेक संकटे आली असता त्यांच्या संकटात आतापर्यंत राजकीय नेते, सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी मदतीचा हात देत पुढाकार घेतला आहे.त्यातच आता कोटक महिंद्रा बँक एम्प्लॉई युनियनेही पुढाकार घेतला असून रविवारी युनियनच्या माध्यमातून सफाई कर्मचारी, रिक्षाचालक, तसेच गरजू नागरिकांना कोटक महिंद्रा बॅक एम्प्लॉई युनियनचे मुख्य पदाधिकारी जय शिवतरकर व शिवसमर्थ सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
                   कोरोना युद्धाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यात राजकीय नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजवंतांना अन्नधान्य वाटप तसेच दोन वेळेचे जेवण वाटप करण्यात आले.त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या टप्यात वाटपाचा दर्जा कमी झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली.याच टप्यात कोटक महिंद्रा बँक एम्प्लॉई युनियन व शिवसमर्थ सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेत गरजुंना जीवनाश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी त्याचे अनेकांना वाटपही केले.यात सफाई कर्मचारी व रिक्षाचालक याना प्रथम पातळीवर मदत देण्यात आल्याने युनियनचे अनेकांनी जाहीर आभारही मानले.यावेळी शिवसेनाशहरप्रमुख विजयजी माने,शिवसेना विभागप्रमुख प्रविण धनावडे , शिवसेना विभाग प्रमुख  तानाजी जाधव ,शिवसेना उपविभागप्रमुख प्रकाश कलगुटकर ,शिवसेना शाखाप्रमुख सुधाकर सावंत ,उपशाखा प्रमुख चव्हाण ,शिवसेना युवाध्यक्ष विनायक   धनावडे,शिवसमर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जय शिवतरकर ,उपाध्यक्ष सुभाष मानकुमरे, मारुती लोंढे,बाबू कदम,अनिल चोपडेकर,सुधीर चिकने,नितिन सानप व नेरुळ सेक्टर १६ ऐ व १६ मधील रहिवाश्यांची उपस्थिती होती.


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image