युवा कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्याने रेशनिंगचा तांदूळ थेट घरपोच 


नवी मुंबई - नेरुळ सेक्टर १६ ऐ मधील रेशनिंग दुकानधारकाची प्रकृती ठीक नसल्याने त्याचे दुकान अनेक दिवस बंद होते.त्यातच शासनाचा नागरिकांना मिळणारा मोफत तांदूळ दुकानात आल्याने तो नागरिकांपर्यत पोहोचवायचा कसा असा प्रश्नही उपस्थित झाला होता.त्यातच दुकानधारकाची प्रकृती सुधारत नसल्याने अखेर दुकानधारकाच्या मदतीसाठी काही स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि अन्नधान्य वाटण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे सेक्टर १८,१६ व १६ ऐ मधील नागरिकांना मोफत तांदूळ मिळण्यास सुरवात झाली.त्याचवेळी त्या स्थानिकांनाही काम करतांना बऱ्याच अडचणी येऊ लागल्या.त्यात शासनाच्या तांदुळाची तारीख संपत आल्याने तो आपल्याला मिळेल की नाही याचीही अनेकांना धास्ती लागली होती.याचाच विचार करत नेरुळ सेक्टर १६ ऐ मधील शिवसेना युवासेनेचे विभाग अधिकारी विनायक धनावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नेरुळ सेक्टर १६ ऐ  मधील नागरिकांना रेशनिंगच्याच मदतीनेच मोफतचा तांदूळ पोहोचवला.त्यावेळी अनेकांनी विनायक व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभारही मानले.
                   रेशनिंग दुकानधारकाची परिस्थिती पाहता नेरुळ सेक्टर १६ ऐ मधील शिवसेना युवासेनेचे विभाग अधिकारी विनायक धनावडे यांनी स्थानिक रहिवाशी योगेश महाजन, किरण बेलोसे, विनीत थोरात, संदीप यादव, जाहिद शेख, किशोर रावते, अनिल चोपडे, नितीन सानप, प्रफुल जाधव यांच्यासह गत सप्ताहात रेशनिंग दुकानधारकांची भेट घेतली आणि १६ ऐ मधील नागरिकांना अद्याप तांदूळ मिळाली नसल्याची माहिती दिली.लवकरच आम्ही तांदूळ पोहचु असे आश्वसन मिळाल्यावर दुकानधारकांना धनावडे यांनी सहकाऱ्यांची भूमिका घेतली.मात्र पुन्हा काही दिवस गेले तरी तांदूळ न आल्याने पुन्हा धनावडे यांनी वरील सहकाऱ्यांसह दुकानधारकांची भेट घेतली व लवकरात लवकर स्थानिकांना तांदूळ मिळावा याची मागणी केली.यावर दुकानधारकांनी धनावडे यांच्याकडे मदतीचे आव्हान केले.त्यांच्या आव्हानाला साद घालत धनावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागातील केशरी कार्ड धारकांची यादी तयार केली ती दुकानधारकांना दिली.त्यानुसार दुकानधारकांनी कार्डधारकांचा सर्व्हे करून कोणाच्या नावावर किती अन्नधान्य आहे याचा सर्व्हे केला.आणि त्यांच्या नावाचा गहू तांदूळ गोण्यांमध्ये बांधून थेट विनायक धनावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून थेट घरापर्यंत पोहोचवला.युवा कार्यकर्त्यांच्या या कृतीचे विभागात स्वागतच होत असून अनेकांनी त्यांचे आभारही मानले आहे.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image