कोरोना युद्धात इतर आजाराने त्रस्त रुग्णांचे हाल 


विरेंद्र म्हात्रे
नवी मुंबई : शहरातील सर्वसामान्यांचे रुग्णालय समजले जाणारे वाशीतील मनपा रुग्णालय सध्या कोरोना रुग्णांसाठी कार्यरत असल्याने इतर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांचे मात्र मोठ्या प्रमाणत हाल झाले आहेत.काही प्रमाणत खासगी दवाखांने बंद आहेत तर काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना प्रवेश बंदीच करण्यात आली आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे अशी मागणी नवी मुंबईकरांमधून होऊ लागली आहे.काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला वाशीतील रुग्णालयात प्रवेशच न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तअश्या घटना वाढू नये या साठी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
                आरोग्य विभागाची अगोदरच दाणादाण असतांना त्यात करोनाचे संकट निर्माण आहे आहे. त्यामुळे पालिकेने वाशी येथील मुख्य रुग्णालय हे करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय केले आहे.त्याचवेळी इतर आजाराच्या रुग्णांची ऐरोली, नेरुळ व बेलापूर येथील रुग्णालयांत व्यवस्था केली आहे. मात्र या रुग्णालयाच्या इमारती अत्याधुनिक असल्या तरी येथे अपुऱ्या आरोग्य सुविधा असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.पालिकेने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील काही आरोग्य सेवा नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांत हलवल्या आहेत. तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयांत योग्य पद्धतीने आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात खासगी क्लिनिक व नर्सिग होम बंद असल्याने करोनाव्यतिरिक्त अन्य अजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत. पालिकेने शहरातील २७ आरोग्य केंद्रांत ताप तपासणी केंद्रे सुरू केली असली तरी अपघात, हृदयरोग तसेच अन्य लहान-मोठय़ा आजारांच्या रुग्णांची परवड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगरमधील एका रुग्णाला सातत्याने खोकल्याचा त्रास होत होता. मात्र त्याला नेरुळ व वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. वाशी रुग्णालयात गेल्यानंतर नेरुळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. नेरुळला गेल्यानंतर खोकला असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याची वाशीच्या रुग्णालयात करोनाची तपासणी करण्यात आली.पालिकेने नेरुळ येथील रुग्णालयात एचआयव्ही व क्षयरोग तर ऐरोली येथील रुग्णालयात फेलोसिनिया विभाग हलविण्यात आला आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता विभागच नसल्याने या रुग्णांवर उपचारासाठी अडचण येणार आहे.


कोट - पालिका चांगल्या आरोग्य सेवा देण्याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहे. काही अडचणी येत आहेत,परंतु नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे.  जयवंत सुतार - महापौर
कोट - वाशीचे सार्वजनिक रुग्णालय करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय केले आहे. पालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात इतर विभाग हलविण्यात आले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातही अन्य आजारांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच आरोग्य केंद्रांत ताप तपासणी केंद्रे सुरू आहेत. अन्य रुग्णांनाही कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
अण्णासाहेब मिसाळ - आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका  


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image