रेनकोट, गमबुट आणि गणवेश तत्काळ देण्याची सफाई कामगारांची मागणी

रेनकोट, गमबुट आणि गणवेश तत्काळ देण्याची सफाई कामगारांची मागणी 


नवी मुंबई - मुंबई, ठाणे, बदलापुर, पनवेल, नवी मुंबई  महानगर पालिकांमध्ये हजारो कायम, तथाकथित कंत्राटी सफाई कामगार रस्ते साफसफाईचे काम करतात. हे सफाई कामगार अतिशय धैर्याने व कतृत्व निष्ठेच्या भावनेने, शहर स्वच्छ ठेवण्याच्या निष्ठेने काम करत आहेत. स्वतःच आरोग्य धोक्यात घालुन जनेतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सफाई कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या आघाडीवर हे सफाई कामगार योध्दा साखरे काम करत आहेत. मुख्यमंत्रानी तर हे देवच आहेत. अशी त्यांची प्रशंसा ही केली आहे. परंतु केवळ कौतुकाने पोट भरत नाही. त्या करीता या देवाची काळजी घेणे हे सरकारचे व महानगर पालिकांचे कर्तव्य आहे. महानगर पालिकांच्या अधिकाऱ्यांची या सफाई  कामगारांच्या बाबतीत तुच्छतेची व असवेदंनशीलतेची वृत्ती असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरु आहे. 
                    महानगरपालिकांमधील तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना पावसाळयाच्या सुरूवातीला गणवेश, रेनकोट व गमबुट देणे हे महानगर पालिकांवर बंधनकारक आहे. परंतु या महानगर पालिकांनी मागच्या वर्षी सुद्धा तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना गणेवश गमबुट रेनकोट दिले नव्हते. आता पावसाळा सुरू झाला आहे. आणि शहरांमध्ये कोरोनाची विशेष साथ आहे. या परिस्थितीत कामगारांना पावसात भिजत काम करावे लागल्यावर त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाॅयझर दिले जात नाही. म्हणुन कामगारांच्या आरोग्याचा विचार करून सर्व महानगरपालिकांनी तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना गणवेश, रेनकोट, गमबुट स्वरक्षक साधने देण्यात यावी. अशी मागणी कंत्राटी सफाई कामगारांकडून होऊ लागली आहे.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू