सामाजिक उपक्रमातून सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांचा वाढदिवस साजरा 


नवी मुंबई - सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या युवा नेते सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लॉकडाउनच्या काळामध्ये पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे.वाढदिवस थाटामाटात अथवा मित्रमंडळीमध्ये साजरा न करता विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत साजरा केला आहे.याच दरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण चारी यांनी कोरोना महामारीच्या गेल्या दोन महिने लॉकडाउनच्या काळामध्ये गरजू नागरिकांना स्वखर्चाने सढळ हस्ते मदत करणाऱ्या सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
              वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रभाग क्रमांक ३४ मध्ये सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ई विंग सोसायटी कार्यालयामध्ये केले.या रक्तदान शिबिरामध्ये वेळेची गरज व सामाजिक भान लक्षात घेऊन पुरुष कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तरुण युवक व युवती यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याप्रसंगी माथाडी युनियन चे संयुक्त सरचिटणीस व माथाडी नेते ऋषिकांजी शिंदे (भाई) उपस्थित होते. त्यांनी सुद्धा रक्तदाना मध्ये सहभाग घेतला तसेच त्यांच्या हस्ते व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते रक्तदात्यांचे प्रमाणपत्र, सॅनिटायझर, मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. म्हणून कोरोना च्या महा संकटामध्ये गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळ्या स्वरूपात मदत नव्हे तर कर्तव्य समजून उपक्रम राबविले आणि रक्तदान शिबिर ठेवल्यामुळे उपस्थितांनी सौरभ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी डॉक्टर नितीन दिघे व डॉक्टर नेहा दिघे तसेच टाटा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स टीम यांनी खूप सहकार्य केले यांनी जिवाची पर्वा न करता खूप सहकार्य केले म्हणून यांचे सुद्धा उपस्थितांनी मनापासून आभारही माणण्यात आले.


Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image