नेरुळमध्ये नमुंमपाची लवकरच स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा, वाशीतील पालिका रुग्णालय इतर उपचारांसाठी खुले होणार


नवी मुंबई - कोरोना नियंत्रणासाठी आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी केलेल्या महत्वाच्या सुचनांनुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाही केली असून या अनुशंगाने पालिकेची स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा पालिकेच्या नेरुळ येथील रुग्णालयात उभी राहणार आहे. ही प्रयोगशाळा येत्या काही दिवसांतच कार्यरत होणार असून त्यामुळे कोविड-१९च्या चाचण्या नवी मुंबईतच करणे शक्य होणार आहे. वेळेत चाचण्यांचे अहवाल प्राप्त होवून रुग्णांवर तत्परतेने उपचार करता येणार आहेत.
                 सध्या नवी मुंबईतील नागरिकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी  मुंबईतील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात.त्यामुळे चाचणीचे अहवाल येण्यास किमान दोन ते तीन दिवसांचा विलंब होतो. परिणामी रुग्णावर उपचार करण्यास उशिर होतो. ही बाब लक्षात घेवून पालिकेनेच स्वतःची प्रयोगशाळा स्थापन करावी. या प्रयोगशाळेची क्षमता दिवसाला ५०० कोरोना चाचण्या करण्याची असावी, अशी सुचना लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार पालिकेने हे लॅब उभारणीचे काम हाती घेतले असून आय.सी.एम.आर.च्या नियमानुसार ज्या संस्थेकडे कोरोना चाचण्या करण्याचे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ आहे त्या संस्थेला ही प्रयोगशाळा चालविण्याचे काम देण्यात येणार आहे.आमदार नाईक यांनी सोमवारी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली आणि कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर लोकनेते आमदार नाईक यांच्याशी प्रसिध्दी माध्यमांनी संवाद साधला. लोकनेते आमदार नाईक यांनी सुचविल्याप्रमाणे रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी  प्रत्येक प्रभागात पालिका रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार आहे. खाजगी रुग्णालयात  नागरिकांना  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पालिकेचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. वाशीचे पालिका रुग्णालय ऑगस्टपर्यंत कोविडमुक्त रुग्णालय होवून सर्व प्रकारच्या रोगांवर उपचारासाठी खुले हेाणार आहे. महापालिकेने सुमारे ४० हजार ऍन्टीजेन चाचणी किट खरेदी केले असून सर्वच प्रभागात टप्प्याटप्प्याने त्यांचा वापर करण्यात येणार आहे. वाशीच्या सिडको प्रदर्शनी केंद्रात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजनची सोय निर्माण करण्यात येणार आहे. विविध क्वारंटाईन सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पालिका हेल्पलाईन नंबर जाहिर करणार आहे. कोरोना उपचारादरम्यान लागणारा रेमडीसीवीर व अन्य इंजेक्शनचा साठा पालिका करुन ठेवणार आहे. पालिका रुग्णालयात भरती झालेल्या तसेच खाजगी रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी केली आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेचे तसेच आरोग्य विभागाचे काम  समाधानकारक  आहे मात्र अद्यापही या बाबत आपण १०० टक्के समाधानी नसून कारभारात सुधारणा करण्यासाठी सतर्क राहून पालिका प्रशासनाला सुचना करीत राहू असे नमूद करुन रुग्णालयात भरती झालेला प्रत्येक कोरोना रुग्ण बरा होवूनच बाहेर पडायला हवा, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.  या भेटीप्रसंगी नाईक यांच्यासमवेत माजी खासदार डॉ, संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सांगर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी  सभागृहनेते  रविंद्र इथापे,  माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समिती सभापती नविन गवते,माजी सभापती नेत्रा शिर्के, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेवक विशाल डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.


चौकट...
लोकनेते आ.गणेश नाईक यांनी केलेल्या अन्य महत्वाच्या सुचना...
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवावी.


पनवेलच्या इंडीया बुल क्वारंटाईन सेंटरमध्ये अतिरिक्त सुविधायुक्त सुसज्ज क्वांरटाईन सेंटर सुरु करावे
ऑक्सीजन व व्हेंटीलेटरच्या सुविधेसह सिडको एक्झिबिशन सेंटर येथील क्वारंटाईन सेेंटर ऑगस्टपर्यत पूर्ण क्षमतेने सुरु करावे. या ठिकाणी अतिरिक्त व्हेंटिलेटरची तरतूद करावी.


रुग्णालये अणि क्वारंटाईन सेंटर्समध्ये अतिरिक्त  वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचार्‍यांची भरती करावी.


वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय कोविडमुक्त करुन इतर आजारांसाठी खुले करावे


महिलांची गैरसोय टाळण्यासाठा प्रथम संदर्भ रुग्णालयासह नेरुळ आणि ऐरोली येथील कोविड रुग्णालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा.


कोविड क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयांमधून उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हेल्पलाईन सुरु करावी. 


नेरुळ येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरु करुन त्यामधून तांत्रिक मनुष्यबळाची भरती करावी.


कोविड उपचारासाठी लागणारे रेमिडीसीवीर आणि टोसीलीझुमॅब या दोन इंजेक्शनचा साठा करुन ठेवावा.
 
पालिका आणि खाजगी रुग्णालयांतून ही इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन द्यावीत.


Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image