नवी मुंबई - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पती व त्याच्या सहकाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.हत्या करणाऱ्या पतीने अत्यंत शिताफीने पत्नीची हत्या केली असतांनाही काही दिवसांतच पोलिसांनी या खुनाच्या रहस्याचा उलगडा केला आहे.या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अंबुज महेंद्र तिवारी व श्रीकांत चौबे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.या प्रकरणात श्रीकांत चौबे यांचा टाटा कंपनीचा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ऐरोली येथे राहणारे अंबुज तिवारी व त्याची पत्नी नीलम तिवारी अचानक घर सोडून गेल्याने अंबुज तिवारी यांचे वडील महेंद्र तिवारी यांनी दोघे हरवल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दिली.याच तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरु असता दोन दिवसांपूर्वी अंबुज तिवारी घणसोली परिसरात आढळून आला.त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली.त्याच्या बोलण्यातून पोलिसांनी वेगळाच संशय आल्याने अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवला.त्यावेळी त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.त्याने २३ जुले रोजी घणसोली मध्ये राहणार त्याचा मित्र श्रीकांत चौबे यांच्या मदतीने त्याच्याच घरात पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली.या दोघांनी ओढणीने नीलमचा गळा आवळून तिला अगोदर जीवे ठार मारले.त्यानंतर पुरावा राहायला नको म्हणून तिचा मृतदेह एका ड्रममध्ये लपविला.आणि त्याच दिवशी तो ड्रम मुंबई पुणे हायवे वरील झाडीझुडपात फेकून दिला.पोलिसांनी तो मृतदेह शोधून काढला असता तो मयत नीलमच्या नातेवाईकांना स्वाधीन केला आहे.या प्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरु ठेवली आहे.
पत्नीची हत्या करणाऱ्या पती व त्याच्या सहकाऱ्याला अटक
• Yogesh dnyneshwar mahajan